शेअर मार्केटचा सखोल करणे शक्य नसेल तर म्युच्युअल फंड हा पर्याय गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतो. विशेषत: यातल्या इक्विटी फंडमुळे तज्ञ फंड मॅनेजरद्वारे शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी मिळते. मात्र यामध्ये गुंतवणूक करताना देखील Lum sump (एकरकमी) गुंतवणूक करावी की SIP (systematic investment plan) असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय, यात फायदेशीर काय आहे आणि दोन्ही प्रकारांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते जाणून घेणे आवश्यक आहे.
Mutual Fund Lum sump मधून अधिक परतावा?
SIP असो की Lum sump त्यात किती परतावा मिळणार हे मार्केट आणि फंड मॅनेजरची कामगिरी यावर अवलंबून असते. पण, या दोन्ही मध्ये तुलना करायची झाल्यास Lump sum मध्ये अधिक परतावा (Return) मिळतो अस काही उदहरणावरुन ढोबळपणे म्हणता येते. अर्थातच, इक्विटीमधील गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी असल्यास जास्त परतावा मिळण्याची शक्यता वाढताना दिसते.
असे असले तर दर वेळी ते शक्य होईल असे नाही. एक Lum sump अमाऊंट साठवणे आणि मग गुंतवणूक करणे बरेचदा शक्य होत नाही. अनेकदा मध्येच काही पैसे खर्च केले जाऊ शकतात. आणि पैसे न गुंतवता केवळ खात्यात पडून राहणे ही बाब देखील चांगली मानली जातं नाही. अशा वेळी SIP हा चांगला पर्याय ठरतो. यातूनही मोठा फायदा होत असल्याचे म्युच्युअल फंडसच्या गेल्या काही वर्षातील कामगिरीवरुन दिसून येते.
गुंतवणूकीत सातत्य राहते
SIP मुळे गुंतवणूकीत शिस्तबद्धता येते. दरमहा एवढे पैसे गुंतवायचेच आहेत, यामुळे नियमितता येते. सातत्यपूर्ण गुंतवणूकीमुळे एक मोठी रक्कम तयार होते. कंपाउंडिंगची ताकद अनुभवता येऊ शकते.
नोकरदार गुंतवणूकदारांना SIP जास्त सोईचे
ज्यांना दरमहा पगाराद्वारे उत्पन्न मिळते त्यांच्यासाठी SIP हा अधिक चांगला पर्याय ठरताना दिसतो. नोकरीमुळे दरमहा एक निश्चित रक्कम मिळतं असते. यातून SIP साठी ठराविक रक्कम बाजूला काढणे सोईचे ठरते. अगदी 500 रुपयात सुद्धा SIP करण्याची संधी उपलब्ध होते.
Lumpsum vs SIP हें दोन पर्याय म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात. दोन्हीचेही काही फायदे आहेत. केवळ एकरकमी मोठी रक्कम नाही म्हणून या गुंतवणूकीपासून दूर राहण्याचे कारण नाही. SIP द्वारे कमीत कमी रकमेने देखील सुरुवात करता येईल.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)