Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF Calculator - Public Provident Fund Calculator Online in Marathi

वार्षिक गुंतवणूक
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
एकूण व्याज
परिपक्वता मूल्य

 

MahaMoney PPF Calculator कसा वापरायचा? त्याचे फायदे काय?

PPF कॅल्क्युलेटरविषयी जाणून घेण्यापूर्वी PPF मधील गुंतवणूक, गुंतवणुकीतली सुरक्षितता आणि त्यातल्या कायदेशीर गोष्टी आधी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आधी PPF म्हणजे काय हे समजून घेऊया.

 

PPF म्हणजे काय? त्यात कशी गुंतवणूक करायची?

PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंड फंड किंवा सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी. हे केंद्रसरकारची योजना असल्यामुळे सगळ्यात सुरक्षित आणि दीर्घ काळात चांगला परतावा देणारी योजना म्हणून ओळखली जाते.

मूळात केंद्रसरकारने ही 1968 मध्ये PPF योजना लागू केली. आणि तेव्हा योजनेचा हेतू भारतीय नागरिकांना निदान छोट्या छोट्या रकमेची बचत करण्याची सवय लागावी हा होता. बँक खात्यांच्या नंतर ही सगळ्यात मूलभूत आणि देशातली अगदी सुरुवातीची बचत योजना मानली जाते. इथं खातेधारक किमान 500 ते कमाल 1,50,000 रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करू शकतो.

त्यासाठी भारतीय नागरिक असलेली व्यक्ती एखादी बँक, भारतीय पोस्ट अशा मान्यताप्राप्त संस्थांमध्ये PPF खातं उघडू शकते. PPF खात्यात वर्षातून कितीही वेळा पैसे टाकता येतात. तुम्ही अगदी SIP पद्धतीनेही यात पैसे गुंतवू शकता. बँक खात्यातून पैसे हस्तांतरित करणे तसंच रोख रक्कम किंवा धनादेश या पद्धतीनेही तुम्हाला PPF खात्यात पैसे भरता येतात.

 

PPF गुंतवणुकीवर व्याजदर कसा ठरतो?

केंद्रसरकार दरवर्षी बजेट किंवा बजेटच्या सुमारास नवीन आर्थिक वर्षासाठी PPF व्याजदर घोषित करत असतं. चक्रवाढ पद्धतीने हे व्याज लागू होतं. आणि खातेदाराच्या खात्यात वर्षातून चारदा तिमाही पद्धतीने व्याज जमा होतं.

सध्या आर्थिक वर्ष 2023-24 साठी हा व्याजदर 7.1% इतका निर्धारित करण्यात आला आहे. याशिवाय PPF खात्यातल्या गुंतवणुकीवर व्याज कसं मोजलं जातं याविषयीची माहिती तुम्ही या लिंकमध्ये मिळवू शकता. https://mahamoney.com/ppf-interest-rate-public-provident-fund-how-is-ppf-interest-accrued

 

PPF साठी लॉक-इन कालावधी

PPF ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. आणि त्यासाठी 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. म्हणजे 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही या खात्यातून संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकत नाही. पण, काही गुंतवणूक काढून घेण्याची परवानगी तुम्हाला 7 वर्षांनंतर मिळते. याला पार्शल विड्रॉवल (Partial Withdrawal) असं म्हणतात.

या खात्यात तुम्ही केलेली बचत आणि त्यावर मिळालेलं व्याज समजून घेण्यासाठी तुम्हाला या खात्याचं एक पासबुक दिलं जातं. तुमचं खातं एखाद्या बँकेत असेल तर जमा झालेली रक्कम तुम्हाला ऑनलाईनही समजू शकते. तसंच अशा PPF खात्यात तुम्हाला ऑनलाईन पैसेही जमा करता येतील. पण, पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या खात्यातील व्यवहारांसाठी तुम्हाला व्यक्तिश: नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल.

 

PPF खातं कसं उघडायचं? ही गुंतवणूक करमुक्त आहे का?

एखादं बँक खातं उघडण्याची आणि PPF खातं उघडण्याची प्रक्रिया सारखीच आहे. कागदपत्रंही तीच लागतात. फक्त भारतात एक व्यक्ती कितीही बँक खाती उघडू शकते. तर PPF खातं मात्र एका व्यक्तीसाठी एकच असू शकतं. अर्थात, कुंटुंबातल्या व्यक्तींच्या PPF खात्यांमध्ये तुम्ही वेगवेगळी गुंतवणूक करू शकता.

सर्व राष्ट्रीय बँकांमध्ये तसंच पोस्ट ऑफिसमध्ये PPF खातं उघडलं जातं. तसंच अलीकडेच सरकारने HDFC, ICICI, अॅक्सिस यासारख्या काही खाजगी बँकांनाही PPF खातं उघडण्याची परवानगी दिली आहे.

PPF खात्यात वर्षभरात जमा केलेल्या दीड लाखांपर्यंतच्या रकमेवर तुम्हाला कर वजावट मिळते. तर यावर मिळणारं सर्व व्याज हे करमुक्त आहे. आता PPF विषयीच्या सगळ्या माहितीसाठी खालील कोष्टक पाहा,

PPF योजना

माहिती 

सध्याचा PPF व्याजदर 

7.1%

योजनेचा कालावधी 

15 वर्षं 

गुंतवणुकीची किमान रक्कम 

500 रु

गुंतवणुकीची कमाल रक्कम 

1,50,000 रु

वर्षभरात कितीदा गुंतवणूक करता येते? 

किमान 1; कमाल 12

लॉक-इन कालावधी 

15 वर्षं

एका व्यक्तीची किती खाती असू शकतात? 

1

15 वर्षांच्या कालावधीनंतर विस्तार 

प्रत्येकी 5 वर्षं असा दोनदा 

80C अंतर्गत मिळणारी कर वजावट 

1,50,000 रु

व्याजाच्या रकमेवर कर 

करमुक्त व्याज 

आता महामनी PPF कॅल्क्युलेटरकडे वळूया

वर दिलेली माहिती आणि योजनेतील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची क्लिष्टता तुम्हाला लक्षात आली असेल. वर्षातून तीनदा जमा होणारं व्याज आणि चौथ्यांदा जमा होणारं वार्षिक व्याज यांचं गणित मांडणं आपल्यासाठी सोपं नाही. ही क्लिष्ट आकडेमोड आहे. हे काम महामनी PPF कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी सोपं करू शकतो.

तुम्ही करणार असलेली किंवा केलेली वार्षिक गुंतवणूक या कॅल्क्युलेटरमध्ये टाकलीत आणि किती कालावधीचा विचार तुम्ही करत आहात हे टाकलंत की, त्या कालावधीत तुमच्याकडे किती निधी जमा झालेला असेल याचा निश्चित आकडा समोर येईल.

व्याजदर सरकार ठरवत असतं. आणि तो दरवर्षी बदलू शकतो. तो इथं अध्यारुत आहे.

महामनी PPF कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही काही कालावधीनंतर जमा होणारी संपत्ती किंवा तितकी संपत्ती जमा करण्यासाठी आवश्यक वार्षिक गुंतवणूक यांचा नेमका आराखडा मांडू शकाल.

 

महामनी PPF कॅल्क्युलेटरचं गणिती सूत्र आणि तो कसा वापरायचा?

या कॅल्क्युलेटरसाठी वापरलेलं सूत्र पुढील प्रमाणे आहे,

F = P [ ( { ( 1+i )n } - 1 ) / i ]

F - PPF खात्यात जमा झालेला एकूण निधी

P - वार्षिक गुंतवणूक

I - वार्षिक व्याजदर

N - गुंतवणुकीचा कालावधी

महामनी PPF कॅल्क्युलेटर वापरणं अगदी सोपं आहे.

प्रत्येक घटकाखाली दिलेली निळी रेषा हलवून तुम्ही नेमका आकडा निवडू शकता. किंवा चौकटीत तुमचा आकडा लिहा

Step 1 : PPF खात्यात तुम्ही केलेली किंवा करणार असलेली वार्षिक गुंतवणूक लिहा

Step 2 : तुमच्या गुंतवणुकीची मुदत किंवा एकूण कालावधी लिहा


महामनी PPF कॅल्क्युलेटरचे फायदे

महामनी PPF कॅल्क्युलेटर या सोप्या आणि वापरायला सुटसुटीत साधनामुळे तुम्ही PPF खात्यात  केलेल्या (किंवा करू इच्छित असलेल्या) वार्षिक गुंतवणुकीवर ठरावीक कालावधीनंतर तुम्हाला नेमका किती परतावा मिळू शकेल आणि तुमच्याकडे एकूण किती निधी जमा होऊ शकेल याचा घेतलेला अंदाज घेऊ शकाल.

या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही पीपीएफ खात्यातल्या तुमच्या गुंतवणुकीचं जास्त चांगलं नियोजन करू शकता. या कॅल्क्युलेटरचे फायदे बघूया,

गुंतवणूक परताव्याचा सर्वात अचूक अंदाज - गुंतवणूक करताना आपला महत्त्वाचा प्रश्न असतो की, ठरावीक कालावधीनंतर या गुंतवणुकीतून नेमका किती निधी जमा होईल. एकूण निधीचा अंदाज घेण्यासाठी हा कॅल्क्युलेटर खूप उपयोगाचा आहे. आणि कागदावर आपण ही आकडेमोड करणं खूपच जिकिरीचं आहे. याउलट यंत्राच्या मदतीने आपण बिनचूक हा अंदाज मांडू शकतो.

सुटसुटीत वापर - महामनी PPF कॅल्क्युलेटर हा ऑनलाईन उपलब्ध आहे. महामनी वेबसाईटवर या कॅल्क्युलेटरच्या पेजवर गेलात की, लगेच तुम्ही याचा वापर करू शकाल. आणि तुमचा अंदाजे परतावा त्वरित तुम्हाला मिळेल. हा कॅल्क्युलेटर वापरायला अत्यंत सोपा आहे.

गणिती आकडेमोड सोपी होते - एरवी मोठ्या कालावधीची गणितं करणं किंवा कागदावर, तोंडी आकडेमोड करणं सोपं नाही. पण, यंत्राच्या मदतीने हे आकडेवारी सोपी होते. हा कॅल्क्युलेटरचा फायदा आहे. शिवाय तुम्ही करणार असलेल्या गुंतवणुकीतून 7, 10, 15 अशा विविध कालावधीत तुम्हाला किती परतावा मिळू शकेल याचा अंदाज या कॅल्क्युलेटरमधून तुम्हाला येईल. 

 

 

 

महामनीचे इतर कॅल्क्युलेटर
NPS - National Pension Scheme 
Home Loan EMI  Calculator
SIP - Mutual Funds Calculator
EPF - Calculator
Lumsum - Mutual Funds Calculator