दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान आणि घरगुती वापराच्या वस्तूंच्या विक्रीत 8% वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री 25% वाढली आहे. सुरुवातीच्या काही महिन्यांत ही विक्री मंद स्वरूपाची होती मात्र वर्षाच्या अखेरीपर्यंत यात मोठी वाढ बघायला मिळाली. एका वर्षापूर्वी कोविड-19 निर्बंध आणि लॉकडाऊनच्या काळात जास्त मागणीमुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री 18% आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री 30% वाढली होती. एक्झिक्युटिव्ह आणि बिझोम या संस्थेने एका अहवालाच्या माध्यमातून हे मांडले आहे. 2022 मध्ये अतिशय कडक उष्णतेमुळे या आर्थिक वर्षात शीतपेयांच्या विक्रीत 24% वाढ झाली, तर कमॉडिटी उत्पादनांची विक्री 8% वर स्थिर होती.
प्रिमीयम उत्पादनांच्या विक्रीत वाढ (Premium Products Sales Rise)
2022-23 मध्ये रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन आणि टेलिव्हिजन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत किमतीनुसार 20-25% वाढ झाली होती, ज्यामुळे प्रीमियम उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात 5-7% किंमती वाढल्या. प्रिमीयम श्रेणीतील उत्पादनांची विक्री 10-15% वाढली, असे गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड कमल नंदी यांनी सांगितले.
2023-24 मध्ये रिलायन्स स्पर्धेत सहभागी (Participating in Reliance competition)
वाढती मागणी व स्पर्धा लक्षात घेऊन रिलायन्सने अलीकडेच साबण, डिटर्जंट पावडर आणि डिश वॉशिंग साबण यासह अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यांच्या किमती बाजारातील कंपन्यांच्या उत्पादनांपेक्षा 30-35% कमी आहेत. याआधी रिलायन्सने कॅम्पा बाजारात नव्याने सादर करून पेप्सी आणि कोक सारख्या ब्रँडशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ग्राहक सामान खरेदीसाठी रिलायन्सकडे वळण्याची शक्यता आहे.