शीला फोम कंपनी लवकरच त्यांची स्पर्धक कंपनी कुर्लन कंपनी (Kurlon Mattress) खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या डीलसाठी शील फोम कंपनीने 2 हजार कोटी रुपयांची बोली लावली आहे. या कंपनीचा बाजारातील एकूण हिस्सा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. गाद्यांची निर्मिती करणाऱ्या उद्योगातील शीला फोम लिमिटेड कंपनीने आपल्याच उद्योगातील स्पर्धक कंपनी कुर्लॉन कंपनी 2 हजार कोटी रुपयांना विकत घेण्याची तयारी केली आहे, असे वृत्त ईटी नाऊ या चॅनेलने दिले.
गादी उद्योगाची उलाढाल 17500 कोटी रुपयांची
भारतातील गादी उद्योगाची उलाढाल (Indian Mattress Industry) ही 17500 कोटी रुपयांची आहे. शीला फोम आणि कुर्लॉन यांच्यातील डील यशस्वीरीत्या पार पडली तर शीला फोम कंपनी 35-40 टक्के मार्केट शेअरची ऑर्डर देऊ शकते. शीला फोम सध्या स्लीपवेल (Sleepwell Mattress) या ब्रॅण्डने मार्केटमध्ये गाद्यांची विक्री करत आहे आणि शीला फोम ही गादी उद्योगातील एकमेव कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झालेली आहे.
शीला फोम ही देशातील एकमेव लिस्टेड गादी बनवणारी कंपनी आहे. शीला फोम सध्या स्लीपवेल या ब्रॅण्डने मार्केटमध्ये लिस्टेड गाद्यांची विक्री करत आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या रिपोर्टनुसार, शीला फोम कंपनीचे मुख्यालय गाझियाबादमध्ये असून या कंपनीचा गादी मार्केटमध्ये 25 टक्के वाटा आहे. शील फोम आणि कुर्लॉनमधील डीलच्या बातमीनंतर शीला फोमच्या शेअर्समध्ये बुधवारी (दि. 28 डिसेंबर) 5 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1338 रुपयांवर पोहोचले (Sheela Foam Share Price) होता. तो आज 1297 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.
कुर्लॉनचा आर्थिक वर्ष 2020 मध्ये वार्षिक निव्वळ नफा 760.9 दशलक्ष रुपये इतका होता. त्यात 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या कुर्लॉनचा निव्वळ नफा 179.7 दशलक्ष रुपयांवर आला आहे. कुर्लॉनची सुरूवात 1962 मध्ये कर्नाटक कॉयर प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीपासून झाली होती. सध्या कुर्लॉनचे देशभरात 9 प्रकल्प आणि एकूण 72 शाखा कार्यरत आहेत.