Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2: महिलेने घरोघरी जाऊन साडीची विक्री करून उभा केला बिझनेस, शार्क झाले इमोशनल

Shark Tank India 2 New Promo

Image Source : http://www.bollywoodfarm.com/

Shark Tank India 2 New Promo: शार्क टँक इंडिया सीझन 2 नवीन वर्षाच्या पहिल्या आठवडयात सुरू होणार आहे. या शो चा दुसरा प्रोमो दाखविण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एक महिला आपल्या पैठणी साडीच्या बिझनेसबाबत सांगताना दिसत आहे. तिच्या साडीच्या बिझनेसबाबत नक्की काय प्रोमो मध्ये दाखविण्यात आले, ते पाहूयात.

Shark Tank India 2: फक्त आता काहीच दिवस शिल्लक असतानाच, या शो चा दुसरा प्रोमो दाखविण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पैठणी साडी बनविण्याचा व्यवसाय दिसत आहे. सोबतच जज इमोशनल झाल्याचे देखील दिसले. या प्रोमोबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

महिलेने कसा उभा केला पैठणीचा बिझनेस

शार्क टॅंक इंडियाच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये एक महिला दिसत आहे. वेरी मच इंडियन नावाची कंपनी चालविणारी महिला तिच्या व्यवसायाबाबत सांगत आहे. तिची ही कंपनी पैठणी साडयांचा बिझनेस करत आहे. सुरूवातीला या माहिलेने घरोघरी जाऊन साडयांची विक्री केली आहे. ती महिला म्हणते की, सुरूवातीच्या काळात मला खूप साऱ्या आवानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागले. तिची ही परिस्थिती ऐकून जजदेखील इमोशनल झाले असल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेल्दी सूप बिझनेसबाबत...

प्रोमोमध्ये या महिलेव्यतिरिक्त एक तरूण बिझनेसमॅनदेखील आपल्या हेल्दी सूप बिझनेसबाबत सांगत आहे. तो परिक्षकांना आपला बिझनेस लहान मुलांसाठी कसा फायदेशीर आहे, हे सांगत आहे. यावेळी शार्क अनुपम मित्तल व विनित सिंह यांनी पोषक तत्वांबाबतदेखील काही प्रश्न विचारले. आता हा शो आपल्याला 2 जानेवारी 2023 पासून पाहायला मिळेल. या दोन्ही बिझनेसबाबत संपूर्ण माहितीदेखील पहिल्याच एपिसोडमध्ये कळेल. पाहूयात, मग या शो मध्ये आणखी काय खास पाहायला मिळेल. शार्क नक्की कोणाच्या बिझनेसमध्ये किती गुंतवणूक करतील. हे जाणून घेण्यासाठी आमच्या ‘महामनी’ या पोर्टलवर अपडेट रहा.