Harsh Goenaka v/s Anupam Mittal: शार्क टॅंक इंडिया सीझन 2 (Shark Tank India 2) हा बिझनेससंबंधी रियालिटी शो नेहमीच चर्चेत असतो. यातील शार्क नव्याने बिझनेस करणाऱ्या युवकांना आर्थिक असा आधार देतात. मात्र त्यांची हीच नाजूक पकड पाहून बिझनेसमॅन हर्ष गोएंका(Harsh Goenaka) यांनी सोशलमिडीयावर ट्विट करत सांगितले की, शार्क टॅंक इंडिया 2 च्या परिक्षकांचे बिझनेस सध्या धोक्यात आहेत. फक्त अमन गुप्ता (Aman Gupta) यांची कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. त्यांनी केलेल्या या मोठया वक्तव्यावर अनुमप मित्तल (Anupam Mittal) यांनी काय प्रतिउत्तर दिले हे पाहुयात.
हर्ष गोएंका यांनी शार्कवर काय केले ट्विट?
शार्क टॅंक इंडिया 2 हा रियालिटी शो सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तसेच नव उदयोगांनी सादर केलेल्या आयडियादेखील नेहमीच भाव खाऊन जातात. आता मात्र हा शो नवउदयोगांच्या आय़डिया नाही, तर बिझनेसमॅन हर्ष गोएंका यांची सोशल मिडीयावर केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आहे. हर्ष यांनी ट्विटच्या माध्यमातून पोस्ट केले की, शार्क टॅंक इंडिया 2 चे परिक्षक जे नवउदयोगांच्या बिझनेसमध्ये आर्थिक स्वरूपात जे करोडो रूपयांचे डील करतात, सध्या त्याच परिक्षकांचे बिझनेस करोडो रूपयांनी नुकसानमध्ये आहेत. तसेच त्यांनी याबाबत काही डाटादेखील शेयर केला आहे. यामध्ये विनिता सिंह, नमिता थापर, अनुपम मित्तल, पियुष बंसल व अमित जैन यांच्या कमाईबाबत माहिती दिली आहे. तसेच पोस्टमध्ये सांगितले आहे की, बोटचे संस्थापक अमन गुप्ता (Aman Gupta) यांच्याव्यतिरिक्त सर्व शार्कचे बिझनेस लाॅसमध्ये आहेत.
हर्ष गोएंका यांच्या ट्विटवर अनुपम मित्तल यांची प्रतिक्रिया
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी शार्क टॅंक इंडिया सीझन 2 मधील परिक्षकांवर केलेल्या वक्तव्यावर Shadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे. अनुपम मित्तल म्हणतात की, मला माहिती आहे की, तुम्ही आमची मस्करी करत आहात. पण सर तुमचा मान राखत मला एवढेच म्हणायचे आहे की, तुम्ही शेयर केलेला हा डाटा पूर्णपणे पक्षपाती व अपूर्ण असा आहे. मला तुमच्याकडून काही चांगले शिकण्याची संधी मिळेल. पण मी तुम्ही केलेल्या पोस्टवर स्पष्टीकरण देतो की, सर्व शार्कचे बिझनेस काही धोक्यात नाही, उलट ते फायदयात चालले आहेत आणि आमचे हे कामच आहे. यापूर्वी लिंकडिनवर अंकित उत्तम यांनी एक विस्तृत स्वरूपात माहिती दिली होती की, शार्क टॅंक इंडियाच्या परिक्षकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर मी मत व्यक्त करतो की, ते योग्य सल्ला देण्यास पात्र नाही आहेत.