एकीकडे शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. मात्र काही शेअर्स चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. DCX Systems हा एक असाच समभाग म्हणता येईल. सोमवारी या शेअर्सच्या किमतीत तब्बल 15 टक्क्यांनी उसळी बघायला मिळाली. सोमवारी बाजार बंद होताना हा शेअर्स 174.15 रुपये किमतीपर्यंत पोचला होता. या पार्श्वभूमीवर DCX systems या शेअर्सकडे आज गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले होते. आज मात्र या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली. 3.75 रुपयांची घसरण होत 166.85 असा दर बाजार बंद होताना होता. यात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 2.20 टक्के इतकी घट झाली.
शेअर मार्केटमध्ये नोव्हेंबरमध्ये या कंपनीचे लिस्टिंग झाले होते. त्यावेळी DCX System ने पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांना तब्बल 39 टक्के इतका परतावा दिला होता. इलेक्ट्रॉनिक सबसिस्टम तयार करणाऱ्या DCX System ची नोव्हेंबरमध्ये बीएसई आणि एनएसई अशा दोन्ही मार्केटमध्ये लिस्टिंग झाली. कंपनीने IPO मधून 500 कोटींचे भांडवल उभारले होते. DCX System च्या आयपीओ योजनेला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. DCX System ने IPO साठी प्रती शेअर 197-207 असा दर निश्चित केला होता. IPO च्या शेवटच्या दिवशी कंपनीचा इश्यू 69.79 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला होता.त्यात नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा हिस्सा 43.79 पट आणि क्वालिफाई़ड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा 84.32 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला होता.
3 महिन्यांच्या कालावधीत मोठी घट
मात्र लिस्टिंग झाल्यानंतरच्या एकूण कालावधीचा विचार केला तर मात्र या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली बघायला मिळते. 11 नोव्हेंबर 2022 रोजी 308.45 रुपयांवर ट्रेड करणारा हा शेअर्स आता 166.85 रुपयांवर ट्रेड करताना दिसत आहे. गेल्या महिनाभराचा विचार केला तरी या कालावधीत 22.18 टक्क्यांची घट झालेली बघायला मिळत आहे. 47.30 रुपये इतकी या कालावधीत किमतीत घसरण झाली आहे.
DCX Systems विषयी
सिस्टम्स आणि केबल हार्नेसच्या प्रमुख भारतीय उत्पादकांपैकी एक. हे ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन असेंब्ली आणि सिस्टम इंटिग्रेशन सेवा प्रदान करते. मुख्य उत्पादनाविषयी बोलायचे झाल्यास सिस्टम इंटिग्रेशन ते रडार सिस्टीम, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध, क्षेपणास्त्रे आणि दळणवळण प्रणालीच्या क्षेत्रात सिस्टम इंटिग्रेशनचे कार्य करतात. केबल आणि वायर हार्नेस असेंब्ली हे एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांसाठी केबल आणि वायर हार्नेस असेंब्लीची विस्तृत श्रेणी तयार करते. फाइन वायर केबल असेंब्ली या हलक्या वजनाच्या आणि उच्च तापमानाला प्रतिरोधक केबल्स आहेत ज्या एरोस्पेस, मरीन, स्पेस आणि वैद्यकीय अनुप्रयोगांमध्ये वापरल्या जातात.वायर्ड एनक्लोजर्स हे कंपनी संरक्षण आणि एरोस्पेस मार्केटसाठी उच्च-विश्वसनीय बॅकप्लेन असेंब्ली आणि वायर्ड एन्क्लोजरचे उत्पादन करते.
DCX Systems Ltd. हे ELTA Systems Ltd. आणि Israel Aerospace Industries Ltd. साठीचे सर्वात मोठे भारतीय ऑफसेट भागीदार (IOPs) आहे. संरक्षण आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी इस्रायलच्या सिस्टम मिसाइल आणि स्पेस डिव्हिजन. कंपनी कर्नाटकातील बेंगळुरू येथील हाय-टेक डिफेन्स अँड एरोस्पेस पार्क SEZ येथे तिच्या उत्पादन सुविधेद्वारे कार्य करते.
30 जून 2022 (Q1 FY23) पर्यंत, DCX Systems चे संपूर्ण इस्रायल, युनायटेड स्टेट्स, कोरिया आणि भारतामध्ये 26 ग्राहक होते. त्याच्या क्लायंटमध्ये फॉर्च्युन 500 कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्टार्ट-अप यांचा समावेश आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, अॅस्ट्रा राफेल कॉमसिस, अल्फा-एलसेक डिफेन्स अँड एरोस्पेस सिस्टम्स आणि कल्याणी राफेल अॅडव्हान्स सिस्टम्स हे कंपनीचे काही प्रमुख ग्राहक आहेत.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)