Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ShareChat Layoffs:शेअर चॅटने पुन्हा एकदा दिला कर्मचाऱ्यांना धक्का, इतक्या कर्मचाऱ्यांची केली कपात

ShareChat Announces Lay-Offs

Image Source : http://www.financialexpress.com/

ShareChat Announces Lay-Offs: शेअरचॅटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करून कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. यावेळेस 600 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे, याविषयी अधिक माहिती जाणून घेवुयात.

ShareChat Parent Fires 600 Employees: जागतिक मंदीचे सावट भारतात ही दिसत आहे. एकामागोमाग एक-एक कंपनी आता कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. आता भारतातील सोशलमिडीया प्लॅटफॉर्म शेअरचॅटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेवुयात.

किती कर्मचारी काढले (How many Employees Were Fired)

भारतातील सोशलमिडीया प्लॅटफॉर्म शेअरचॅटने यापूर्वी फॅटसी गेमिंग प्लॅटफॉर्म बंद करून 5 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. आता पुन्हा एकदा या कंपनीने मोठया प्रमाणात कर्मचाऱ्यांचा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉन परफॉर्मर म्हणजेच कामाच्या बाबतीत अकार्यक्षम असलेल्या निकषावर जवळपास 600 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आले असल्याचे सांगितले जात आहे. हा निर्णय शेअरचॅट व मोज (Moj) सारख्या प्रसिध्द सोशल मिडियाची मालकी असलेल्या ‘मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा हा निर्णय असल्याची माहिती मिळाली आहे. 

कपात कर्मचाऱ्यांना काय मिळणार (What will the Reduction Employees Get)

नोकरीवरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पिरीयडमधील पूर्ण पगार, कंपनीशी जोडलेल्या प्रत्येक वर्षासाठी दोन आठवडयांचा पगार तसेच डिसेंबर 2022 पर्यंत व्हेरिएबल पे ची शंभर टक्के रक्कम मिळण्याची शक्यता आहे. सध्या जाहिराती व लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून दुप्पट कमाई करणे हा कंपनीचा मुख्य हेतू आहे. बाजारातील घडामोडी पाहता गुंतवणूकीसाठी सतर्क राहण्याचे कंपनीचे मोठे प्रयत्न सुरू आहे.

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया (Officials' Reaction)

आम्ही आमच्या इतिहासातील सर्वात कठीण व वेदनादायी निर्णय घेत आहोत. आम्ही आमच्या कंपनीतील सहाशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्याचे धाडस करीत आहोत. हा निर्णय खूपच विचारपूर्वक घेतला आहे. 

शेअरचॅट कंपनीची सुरूवात (Start of ShareChat company)

शेअरचॅट कंपनीची सुरूवात 2015 मध्ये करण्यात आली होती. शेअरचॅट हे सर्वात लोकप्रिय असे सोशलमिडीया प्लॅटफॉर्म आहे. भारतात दर महिन्याची युजर्स संख्या ही 40 कोटीच्या आसपास  आहे. 2015 मध्ये अंकुश सचदेवा, भानू प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांनी मिळून ही कंपनी सुरू केली होती. शेअरचॅट व्यतिरिक्त ही कंपनी मोज Moj हे प्लॅटफॉर्मदेखील चालविते. सध्या मोज हे सोशलमिडीया प्लॅटफॉर्म युजर्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे.