Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market closed: सेन्सेक्स 148 अंकांनी घसरला, ग्लँड फार्मा, नायकाचेही शेअर्स कोसळले

Share Market Closed

Stock Market Closing Bell: भारतीय शेअर बाजार गुरुवारी, 12 जानेवारी रोजी घसरणीसह बंद झाला. टाटा मोटर्स, अदानी पॉवर आणि रिलायन्सचे आदींचे शेअर्स घसरले. संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Share Market Closed: जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे भारतीय देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी, दिनांक 12 जानेवारी रोजी धिम्या गतीने सुरू होता. सेन्सेक्स 148 अंकांनी घसरला आणि निफ्टीनेही घसरण नोंदवली. बाजार बंद होताना पेटीएम, ग्लँड फार्मा, न्याका, टाटा मोटर्स, आयटीसी, अदानी पॉवर आणि रिलायन्सचे शेअर घसरलेले होते.

गुरुवारी भारतीय शेअर बाजार उघडल्यानंतर गुंतवणूकदारांना तेजीची अपेक्षा होती, मात्र संध्याकाळी बाजार लाल रंगाच्या चिन्हावर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स 147.47 अंक किंवा 0.25 टक्क्यांनी घसरून 59 हजार 958.03 वर बंद झाला. तर, निफ्टी 50 निफ्टी 37.50 अंकांनी किंवा 0.21 टक्क्यांनी घसरून 17 हजार 858.20 वर बंद झाला.

बाजारातील मंदीचा परिणाम आयटी, बँकिंग, वित्त क्षेत्रातील समभागांच्या घसरणीसह दिसून आला. बाजार बंद झाल्यावर पेटीएमचे शेअर्स 35.65 रुपये किंवा 6.16 टक्क्यांनी घसरून 543.50 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. तर दुपारच्या सत्रात पेटीएमचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला. पेटीएमच्या घसरणीचे कारण अलीबाबाच्या 3 टक्के शेअर्सच्या विक्रीसाठी ब्लॉक डील होते.

आजचे वधारलेले आणि घसरलेले टॉप शेअर्स (Top Gainers and Top Losers)

पेटीएम व्यतिरिक्त, ग्लँड फार्मा, न्याका, टाटा मोटर्स, आयटीसी, अदानी पॉवर आणि रिलायन्स गुरुवारी बाजार बंदमध्ये सर्वाधिक तोट्यात होते. ग्लँड फार्माचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले, तर नायकाचे शेअर 4 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी, रिलायन्सचे शेअर्स 54.55 रुपयांनी किंवा 2.16 टक्क्यांनी घसरले आणि 2 हजार 471.60 रुपये प्रति शेअर झाले.

सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांपैकी बिकाजी फूड्स 20.15 रुपये किंवा 5 टक्क्यांनी वाढून 423.50 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टँडर्डचे शेअर्स तब्बल 795 रुपये किंवा 20 टक्क्यांनी वाढून 4 हजार 770 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. लाभधारकांमध्ये, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो, मारुती, एचसीएल 1 टक्क्यांहून वधारले. याशिवाय, इन्फोसिस, एचडीएफसी, नेस्ले, टीसीएस, सन फार्मासह सेन्सेक्समधील 30 शेअर्सच्या संवेदनशील निर्देशांकातील 15 समभागांना मजबूती मिळाली.