मंगळवारी चढ-उतारानंतर बाजार 18 अंकांनी घसरून 60,672 वर बंद झाला आणि निफ्टी 18 अंकांनी घसरून 17,826 अंकांवर बंद झाला. मंगळवारी बाजार ओपन होताना वाढ झालेली बघायला मिळाली होती. मात्र नंतर यात बदल झाला. चढ-उतारानंतर बाजार 18 अंकांनी घसरून 60,672 वर बंद झाला आणि निफ्टी 18 अंकांनी घसरून 17,826 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सर्वात जास्त 3.5% पर्यंत घसरले. दुसरीकडे, एनटीपीसीचे समभाग 3.25% वाढीसह बंद झाले. याआधी सोमवारी सेन्सेक्स 311 अंकांनी घसरून 60,691.54 अंकांवर बंद झाला आणि निफ्टी 97 अंकांनी घसरून 17,847.05 अंकांवर बंद झाला होता.
अमेरिका आणि युरोपच्या वायदे बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही विक्री दिसून आली. या काळात स्पाईसजेटचे शेअर्स सहा टक्क्यांनी घसरले तर एनएमडीसी स्टीलच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांनी उसळी मारली.LKP सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक कुणाल शाह यांच्या मते, बँक निफ्टी निर्देशांक काही दिवसांच्या जोरदार विक्रीनंतर फ्लॅट बंद झाला. निर्देशांक आता 40500 च्या महत्त्वाच्या समर्थन क्षेत्राजवळ व्यापार करत आहे आणि जर तो या पातळीच्या वर टिकून राहण्यात यशस्वी झाला तर तो 41,000-41,300 पातळीच्या दिशेने वळू धावू शकतो. जतिन त्रिवेदी, VP आणि संशोधन विश्लेषक, LKP सिक्युरिटीज यांच्या मते, डॉलर निर्देशांकाच्या तुलनेत रुपया 8 पैशांनी घसरून 82.80 रुपयांच्या जवळ गेला. डॉलर निर्देशांक 103.80-104.10 च्या श्रेणीत व्यवहार करताना दिसला.
मंगळवारी शेअर मार्केट वाढीसह ओपन झाले होते आणि सेन्सेक्स-निफ्टीत दिवसाच्या सुरुवातीला वाढ झालेली दिसून आली होती. देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात थोड्या तेजीने झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी सुरुवातीच्या वेळेत वरच्या श्रेणीत व्यवहार करताना दिसत होते. सेन्सेक्सची हालचाल हळूहळू वाढत सुरुवातीच्या काही मिनिटांतच त्याने 60,800 चा टप्पा ओलांडलेला बघायला मिळाला. निफ्टीही 17900 च्या पुढे गेला होता. मात्र मंगळवारी शेअर बाजार बंद होईपर्यंत हे चित्र कायम राहू शकले नाही. सोमवारी लाल चिन्हासह बाजार बंद झाला होता. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अंतिमत: हेच चित्र बघायला मिळाले. अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स 1571.10 रुपयांवर बंद झाले. या शेअर्सच्या किमतीत 3.11 टक्के इतकी घट झाल्याचे बघायला मिळाले. 50.35 रुपये इतकी ही घसरण झाली. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे.