Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Railway: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात पुन्हा मिळणार सवलती, रेल्वेमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत

Indian Railways

Image Source : www.thehansindia.com

Indian Railways Latest News: रेल्वे बोर्डाने सांगितले की ते ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात सवलत देण्याची योजना आखत आहेत. रेल्वे प्रशासन अजूनही या विषयावर विचार करत आहे, येत्या काळात रेल्वे प्रशासना आपल्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. त्यावर सध्या स्थायी समिती विचार करत आहे.

Indian Railways Senior Citizen Concession:  ज्येष्ठ नागरिकांना लवकरच केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात अगोदर जी सूट मिळत होती ती लवकरच पुन्हा बहाल केली जाऊ शकते. खरं तर, कोविड संसर्गाच्या काळात डबघाईला आलेली आर्थिक स्थिती पाहता, रेल्वेने काही विशेष तीन श्रेणी वगळता इतर सर्वांसाठी भाड्यात सवलत बंद केली होती. यांत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सुविधा देखील बंद करण्यात आल्या होत्या.

कोरोना संसर्गापूर्वी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 50 टक्के सूट दिली जायची. आता कोविड-19 चा धोका कमी होऊन आणि देशात इतर सर्व प्रकारची कामे पूर्णत: सामान्य झाल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिलेला नाही.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली सूट पूर्ववत करू शकते. त्यांनी राज्यसभेत सांगितले की भारतीय रेल्वेने 2019-20 मध्ये प्रवासी तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे, जी प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्तीला सुमारे 53 टक्के इतकी सवलत आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात सवलत देण्याचा विचार करत असल्याचे रेल्वे बोर्डाने सांगितले आहे. रेल्वे अजूनही या विषयावर विचार करत आहे, परंतु येणाऱ्या काळात रेल्वे प्रशासन आपल्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. त्यावर सध्या स्थायी समिती विचार करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना किमान स्लीपर आणि 3 एसी सवलतींचा आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

त्याच वेळी, संसदीय पॅनेलने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सूट पुनर्संचयित करण्याची शिफारस देखील केली आहे. दुसरीकडे, अनारक्षित सामान्य तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने एक खास मोबाईल ऍप, UTS App लाँच केले आहे. आता प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तिकीट काउंटरची संख्या कमी असल्याने अनेक वेळा प्रवाशांना तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागते. आता ही समस्या दूर झाली आहे.