Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BookMyForex: ऑनलाईन परकीय चलन पाठवा आणि 5 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळवा

BookMyForex Student Offer

Image Source : www.bookmyforex.com

BookMyForex: बुक माय फॉरेक्स स्टुडंट ऑफर ही मर्यादित कालावधीची ऑफर असून याचा 30 मार्च 2023 पर्यंत लाभ घेता येणार आहे. BookMyForex वेबसाईट किंवा ॲप वापरून केलेल्या सर्व मनी ट्रान्सफर बुकिंग कॅशबॅक आणि विनामूल्य सिमसाठी पात्र असणार आहेत.

मेकमाय ट्रीप ग्रुपमधील (MakeMyTrip) कंपनी BookMyForex.com या ऑनलाईन फॉरेन एक्स्चेंज मार्केट-प्लेसने आंतरराष्ट्रीय फंड ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि इतर ऑफरसह BookMyForex स्टुडंट ऑफर सुरू केली आहे. BookMyForex हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे परवाना-प्राप्त मनी चेंजर (FFMC - fully-fledged money changer) आहे. ही कंपनी रिअल-टाईममध्ये परकीय चलनासाठी बाजारपेठ म्हणून काम करते.

BookMyForexने म्हटले आहे की, या नवीन ऑफरनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना परदेशात पैसे पाठवण्यावर आणि प्रत्येक ट्रान्सफरवर विनामूल्य इंटरनॅशनल सिम कार्ड सोबतच 5 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळू शकणार आहे. अर्थात “BookMyForex स्टुडंट ऑफर” ही मर्यादित कालावधीची ऑफर असून, याचा 30 मार्च 2023 पर्यंत लाभ घेता येणार आहे. BookMyForex वेबसाईट किंवा ॲप वापरून केलेल्या सर्व मनी ट्रान्सफर बुकिंग कॅशबॅक आणि विनामूल्य सिमसाठी पात्र असणार आहे.

रिअल टाईम रेटने पैसे करा ट्रान्सफर

“BookMyForex जवळच्या आंतरबँक दराने परदेशात पैसे हस्तांतरण प्रदान करते. शिवाय कमिशन देखील आकारला जात नाही. आंतरबँक दर हे “रिअल-टाईम दर” आहेत. जे जवळपास सर्वच बिझनेस न्यूज चॅनेल किंवा सर्च इंजिनवर पाहिले जाऊ शकतात. BookMyForexच्या हस्तांतरणाच्या किमती बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या किमतींपेक्षा जवळजवळ एक किंवा दोन रुपये स्वस्त आहेत. BookMyForex स्टुडंट ऑफर द्वारे, डिजिटल मनी ट्रान्सफर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. जेणेकरून इतर खर्चाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा परदेशातील शैक्षणिक प्रवास सुलभ होऊ शकेल, असे या ऑफरद्वारे नमूद करण्यात आले. 

Book Now, Pay Later चा लाभ घ्या

परदेशी विद्यापीठांमध्ये (Foreign Universities) “विंटर इंटेक” अर्थात हिवाळ्यातील प्रवेश सुरू झाला आहे. आणि अशा वेळी या ऑफरमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ट्यूशन फीज् किंवा राहण्याच्या खर्चासाठी परदेशात पैसे हस्तांतरित करताना या ऑफरचा लाभ घेतल्यास,  मनी-ट्रान्सफरच्या चार्जेसवर  5 टक्क्यांपर्यंत बचत मिळण्यास मदत होऊ शकेल, असा कंपनीचा दावा आहे. ज्या कस्टमर्सना आपल्या पाल्यांना पैसे पाठवायचे आहेत, ते अगदी त्यांच्या सोयीने घरबसल्या आरामात पैसे ट्रान्सफर करू शकतात. आणि एवढेच नाही तर, “Book Now, Pay Later” (आता बुक करा आणि नंतर पैसे द्या) या ऑप्शनचा लाभ घेऊ शकतात. कस्टमर्सना “STUDENTOFFER” या प्रोमो-कोडचा वापर करावा लागणार आहे.

फंड कसा ट्रान्सफर केला जाऊ शकेल? 

RBI ने आणलेल्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) योजनेमुळे, भारतीय रहिवाशांना वैयक्तिक परकीय चलनाचे व्यवहार सहजतेने करता येतात. RBI च्या LRS योजनेअंतर्गत फक्त चार सोप्या स्टेप्स फॉलो करून BookMyForex द्वारे शिक्षणाच्या उद्देशाने परदेशात फंड ट्रान्सफर केला जाऊ शकतो.

  • करन्सी, अमाऊंट आणि बेनिफिशिअरी  यांची माहिती भरणे
  • केवायसी सबमिट करा
  • ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा
  • पेमेंट झाले की फंड-ट्रान्सफरची प्रोसेस पूर्ण 


या ऑफर अंतर्गत 5 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकणार आहे. सोबत प्रत्येक ट्रान्सफरसह विनामूल्य आंतरराष्ट्रीय सिमकार्ड देखील मिळणार आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या मुलांना पैसे कसे पाठवायचे? कोणत्या मोडने पाठवायचे? याबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्राहक या प्लॅटफॉर्मवरून फॉरेक्स कार्ड्स, इंटरनॅशनल सिम कार्ड्स तसेच इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्सदेखील खरेदी करू शकतात.