Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Box-office Collection Day 6: पहा, पठाण चित्रपटाने सोमवारी बॉक्स ऑफिसवर किती कोटी कमविले?

Pathan Box-office Collection Day 6

Image Source : http://www.famousbollywood.com/

Pathan Box-office Collection: पठाण चित्रपटाचा कालचा सहावा दिवस होता. सोमवारी म्हणजे सहाव्या दिवशीदेखील शाहरूख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीमध्ये कमवित असल्याचे दिसत आहे. शाहरूख खानसह प्रेक्षक दिपिका पदुकोन व जाॅन अब्राहिमलादेखील पसंद करीत असल्याचे दिसत आहेत. या तिन्ही कलाकारांचा पठाण चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावून ठेवले आहे.

Pathan Movie: पठाण चित्रपटाव्दारे किंग खान (King Khan)ने तब्बल चार वर्षाने मोठया पडदयावर धमाकेदार एन्ट्री केली आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर सहावा दिवस उजाडला तरी थिएटर हाऊस फुल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी पठाण (Pathan) चित्रपटाने कोटी रूपये कमवून अनेक बाॅलिवुड चित्रपटांचे रेकाॅर्ड मोडले असल्याचे पाहायला मिळाले. 

पठाणने सहाव्या दिवशी किती कमविले

पठाण या चित्रपटाने संपूर्ण देशात नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजे सोमवारी बॉक्स ऑफिसवर तब्बल 25 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर सहाव्या दिवशी म्हणजे सोमवारपर्यंत या चित्रपटाने एकूण जगभरात 297 कोटी रूपयांचा गल्ला जमविला आहे. एकंदरीत हा चित्रपट या आठवडयातदेखील बॉक्स ऑफिसवर राज्य करेल असे चित्र दिसत आहे. 

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेयर करत, पठाण चित्रपटाच्या कमाईचे आकडे सांगितले आहेत. त्यांच्या या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, पठाण या चित्रपटाने संपूर्ण जगभरात 500 कोटीपेंक्षा अधिक कमाई केली आहे. त्यापैकी भारतातील या चित्रपटाची कमाई 335 कोटी इतकी आहे. पठाण लवकरच जगभरात 300 कोटी रूपयांचा गल्ला पार करेल अशी शक्यतादेखील त्यांनी वर्तविली आहे.

बाॅयकाॅट पठाण पासून ते बाॅक्स ऑफिस कलेक्शनपर्यंत

पठाण चित्रपटाची सुरूवातच वादग्रस्त झाली होती. या चित्रपटातील दिपिका पदुकोनच्या बिकिनी (Deepika Padukone) पासून ते बाॅयकाॅट पठाणपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होतो की नाही यावर शंका होती. मात्र हे सर्व दावे फेटाळून लावून पठाण चित्रपट आज बाॅक्स ऑफिसवर राज्य करीत आहे. सोशलमिडीयावर या चित्रपटातील गाण्यांचा बोलबाला आहे. तसेच या चित्रपटाने बाॅलिवुडमधील अनेक सुपरहीट चित्रपटांदेखील मागे टाकत एक नवीन रेकाॅर्डदेखील बनविला आहे.