Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI : आता स्टॉक ब्रोकर्स गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर करू शकणार नाहीत

SEBI

बाजार नियामक सेबीने (SEBI – Securities and Exchange Board of India) शेअर बाजारातील व्यवहारासाठी फंड 'ब्लॉक' करण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. हे पाऊल स्टॉक ब्रोकर्सद्वारे गुंतवणूकदारांच्या पैशाचा गैरवापर रोखण्यास मदत करेल.

बाजार नियामक सेबीने (SEBI – Securities and Exchange Board of India) शेअर बाजारातील व्यवहारासाठी फंड 'ब्लॉक' करण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. हे पाऊल स्टॉक ब्रोकर्सद्वारे गुंतवणूकदारांच्या पैशाचा गैरवापर रोखण्यास मदत करेल. आयपीओच्या बाबतीत ही सुविधा आधीच अस्तित्वात आहे. यामध्ये, गुंतवणूकदाराच्या खात्यातून पैसे तेव्हाच कापले जातात जेव्हा त्याला आयपीओ अंतर्गत शेअर वाटपाची सूचना दिली जाते. स्टॉक ब्रोकर्सच्या गैरवापर आणि डिफॉल्टपासून गुंतवणूकदारांच्या पैशाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल, ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (ASBA) सारख्या वैशिष्ट्यासारखे आहे, जे प्रायमरी मार्केटसाठी आधीपासूनच उपलब्ध आहे.

ही आहे सध्याची फ्रेम

सेबीने आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये म्हटले आहे की, सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी फंड ब्लॉक करण्याच्या प्रस्तावामुळे क्लायंट फंडाचा गैरवापर, ब्रोकर डिफॉल्ट आणि गुंतवणूकदारांच्या पैशाला धोका टाळता येईल. सध्याच्या फ्रेमवर्क अंतर्गत, क्लायंटचा अँसेट सीसीपर्यंत पोहोचण्यापूर्वी स्टॉक ब्रोकर आणि क्लियरिंग सदस्यामार्फत जाते. त्याचप्रमाणे सीसीद्वारे जारी केलेले पेमेंट क्लायंटपर्यंत पोहोचण्यापूर्वी क्लिअरिंग सदस्य आणि स्टॉक ब्रोकर्स यांच्यामधून जाण्याच्या सायक्लिक आदेशाचे पालन करते. सीसी दररोज आपल्या सदस्यांना फायनल सेटलमेंट सूचना देते. स्टॉक ब्रोकर क्लायंटसह ऑब्लिगेशन्सची पूर्तता करतो.

पैसे ग्राहकाच्या खात्यात राहतील

सेबीने आपल्या प्रस्ताव पत्रात म्हटले आहे की, शेअर बाजारात खरेदी-विक्रीसाठी फंड ब्लॉक करण्याची सुविधा मिळाल्याने गुंतवणूकदार बँक खात्यात ब्लॉक केलेल्या रकमेवर व्यवहार करू शकतील. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे स्टॉक ब्रोकरकडे पाठवण्याची गरज संपुष्टात येईल. प्रस्तावित मॉडेल अंतर्गत, पैसे ग्राहकाच्या खात्यात राहतील, परंतु क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या नावे ब्लॉक केले जातील. ही रक्कम ब्लॉकचा निश्चित कालावधी संपेपर्यंत किंवा कॉर्पोरेशन काढून टाकेपर्यंत ब्लॉक राहील. क्लिअरिंग कॉर्पोरेशन ग्राहकांच्या खात्यातून तेवढीच रक्कम काढू शकतात जेवढी रक्कम ब्लॉक करण्यात आली होती.