• 07 Dec, 2022 09:52

SEBI Guidelines for Influencers: चुकीचा आर्थिक सल्ला देणाऱ्यांवर सेबी कठोर कारवाई करणार!

SEBI Guidelines for Influencers

SEBI Guidelines for Influencers: सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून बरेच इन्फ्ल्यूअर्स गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन करत असताना गुंतवणूकदारांना चुकीचा सल्ला देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा सेबीने (Securities Exchange Board of India-SEBI) दिला.

SEBI Guidelines : सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत; आणि तुम्ही तुमच्या फॉलोअर्सना (Social Media Influencer) गुंतवणुकीबाबत सल्ला किंवा मार्गदर्शन देत असाल, तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून बरेच इन्फ्ल्यूअर्स म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन करत असताना गुंतवणूकदारांना किंवा फॉलोअर्सना चुकीचा सल्ला देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा सेबीने (Securities Exchange Board of India-SEBI) दिला.

सोशल मिडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जसे की, YouTube, Instagram, Twitter, Facebook, ShareChat, Quora यांच्या माध्यमातून सोशल मिडिआ इन्फ्लूयन्सर (Social Media Influencer) त्यांच्या फॉलोअर्सना गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करत आहेत. पण हे आर्थिक मार्गदर्शन चुकीचे असल्याचे सेबीमधील काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सेबीने याबाबत एक मार्गदर्शक नियमावली केली असून, चुकीचा सल्ला देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई (Social Media Influencers Regulation) करणार असल्याचे सांगितले आहे.

कोरोनानंतर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. या गुंतवणूकदारांनी स्वत:च्या अनुभवावर आधारित एक सिस्टिम तयार केली आहे. त्या सिस्टिमनुसार हे गुंतवणूकदार आता सोशल मिडियाद्वारे इतरांनाही मार्गदर्शन करत आहेत. परिणामी YouTube, Instagram, Linkedin, Telegram वरून इतरांना गाईड करणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. 

[media url="https://www.youtube.com/watch?v=HKhLVOaS_WQ"][/media]


सेबीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना! (SEBI Rules and Regulations!)

सोशल मिडियावरून शेअर मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी टीप्स देणाऱ्या खात्यांवर सेबी नजर ठेवून असणार आहे. अशा स्वयंघोषित सल्लागारांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये व अशा गोष्टींवर आळा बसावा यासाठी सेबीकडून लवकरच सोशल मिडियाद्वारे सल्ला देणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत, अशी माहिती सेबीचे सदस्य एस के मोहंती यांनी एका कार्यक्रमात दिली.

सोशल मिडियावरील आर्थिक सल्लागारांच्या वाढत्या संख्येने सेबीही चिंताग्रस्त!

सेबीच्या नियमानुसार, आर्थिक गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करताना सेबीकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच सेबीकडे नोंदणी करताना संबंधितांना संपूर्ण माहिती सेबीकडे द्यावी लागते. सध्या देशात आर्थिक सल्लागारांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहेत. वाढत्या गुंतवणूक सल्लागारांच्या संख्येमुळे सेबीनेही चिंता व्यक्त केली.

2022 मध्ये इन्फ्ल्यूअर्सच्या विरोधात 422 तक्रारी दाखल!

आर्थिक वर्ष 2022 मध्ये सोशल मिडियावरील स्वयंघोषित आर्थिक सल्लागारांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. अशा चुकीच्या सल्ला देणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रारी सुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत. 2022 मध्ये अशा 422 तक्रारी दाखल झाल्याचे दिसून आले. यामध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक आणि सेबीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे.