सेबी (Securities and Exchange Board of India-SEBI)ने पीजीआईएम एएमसी (PGIM AMC) या म्युच्युअल फंड हाऊसवर 25 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त सेबीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मेनन यांच्यावर 5 लाख रूपये आणि 3 फंड मॅनेजर कुमारेश रामकृष्णन, पुनीत पाल आणि राकेश सुरी यांच्यावर प्रत्येकी 2 लाख रूपयांचा दंड लावला आहे. रामकृष्णन हे फंड हाऊसच्या फिक्स्ड इन्कमचे मुख्य अधिकारी होते. त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ही कंपनी सोडली होती. त्यांच्या जागी पुनीत पाल यांनी मुख्य अधिकारी म्हणून कारभार स्वीकारला होता. तर राकेश सूरी हे डेब्ट स्कीम्सचे फंड मॅनेजर होते. त्यांनी ही जून 2019 मध्ये या पदाचा राजीनामा दिला होता.
त्यांच्यावर आरोप काय होते?
सेबीने पीजीआईएम एएमसीला आपल्या क्लोज-एंड फंड्समधून ओपन एंडेड फंड्समध्ये सिक्युरिटीज ट्रान्सफर केल्यामुळे दोषी ठरवले आहे. PGIM AMC ने ओपन एंडेड स्कीम्समधून क्लोज एंडेड स्कीम्समध्ये स्टॅण्डर्ड सिक्योरिटीज ट्रान्सफर करताना नियमांचे उल्लंघन केले होते. सेबीने आदेशात नमूद केले आहे की, 2018 मध्ये सनी व्यू आणि एस डी कॉर्पोरेशनसारख्या काही सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी फंड हाऊसला याबाबत विचारणा केली.
PGIM AMC आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर सेबी दंड ठोठावण्यापूर्वी कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Kotak Mahindra Asset Management Co Ltd) चे सीईओ, फंड हाऊस, त्यांचे ट्रस्टी आणि डेब्ट फंड मॅनेजर यांच्यावर एकूण 1.6 कोटी रूपयांचा दंड ठोठावला होता. एस्सेल समुहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सेबीने कोटक महिंद्रावर हा दंड लावला होता.
PGIM AMC वर नियमांचे पालन न केल्याचे आणि इंटर स्कीम ट्रान्सफरच्या 315 केसेस आढळल्या आहेत. यातील 25 बाबी या सिक्योरिटीजशी संबंधित होत्या. ज्या नंतर डाऊनग्रेड केल्या गेल्या. हे फंड हाऊस कित्येक वर्षांपासून इंटर स्कीम्स ट्रान्सफर करत आले आहेत. या फंड हाऊसेसनी ओपन एंडेड स्कीम्समधील फंड लिक्विडिटीमध्ये आणण्यासाठी बहुतेककरून ओपन एंडेड फंड्समधून क्लोज एंडेडमध्ये रक्कम ट्रान्सफर केली गेली. ओपन एंडेड फंड्समध्ये दररोजच्या बेसवर खरेदी आणि विक्री होते. म्हणून या योजनांमध्ये लिक्विडिटी खूप महत्त्वाची असते.
दरम्यान, PGIM AMC ने हे आरोप फेटाळले असून, आम्ही कोणतीही अनियमितता केली नाही, असे म्हटले आहे. तसेच सेबीने पाठवलेल्या आदेशाचा अभ्यास करत असल्याचे म्हटले आहे.