कोर्स वर्क फोकस (Course Work Focus) आणि त्याचे मालक शशांक हिरवाणी, कॅपिटल रिसर्च (Capital Research) आणि त्याचे मालक गोपाल गुप्ता, कॅपर्स (Capres) आणि त्याचे मालक राहुल पटेल यांच्यावर सेबीनं कारवाई केलीय. आता यांना सिक्युरिटी मार्केटमध्ये सहा महिन्यांसाठी भाग घेण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलंय. फायनान्शियल एक्स्प्रेसनं यासंबंधीचं वृत्त दिलंय. या संस्था सेबीची नोंदणी न घेताच त्यांच्या ग्राहकांना गुंतवणूक सल्ला देण्याच्या व्यवसायात गुंतल्या होत्या. दोन वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये सेबीला (Securities and Exchange Board of India) हा घोळ लक्षात आला. कोर्स वर्क फोकस आणि हिरवाणी यांनी मार्च 2018 ते जुलै 2020 या कालावधीत गुंतवणूकदारांकडून एकत्रितपणे 96 लाख रुपये मिळवल्याचं निदर्शनास आलंय. दुसरीकडे गुप्ता आणि पटेल यांनी मिळून जून 2014 ते नोव्हेंबर 2019 या दरम्यान अशा नोंदणी नसलेल्या गुंतवणूक सल्लागार सेवा देऊन एकत्रितपणे 60.84 लाख रुपये गोळा केले.
Table of contents [Show]
तीन महिन्यांच्या पूर्ण करावी लागणार प्रक्रिया
या सर्व बाबी कायद्याला अनुसरून नाहीत. याबाबत कुठलीही नोंदणी नाही. गुंतवणूक सल्लागार (IA) नियमांच्या तरतुदींचं त्यांनी उल्लंघन केलं, असं सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) बुधवारी पारित केलेल्या आपल्या अंतिम आदेशात म्हटलं आहे. ग्राहकांकडून मिळालेली रक्कम परत करण्याचे निर्देशदेखील आपल्या आदेशात सेबीनं या संस्थांना दिलेत. तीन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश सेबीनं
तक्रारीनंतर कारवाई
त्यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे सहा महिन्यांसाठी किंवा गुंतवणूकदारांना परतावा पूर्ण झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांची मुदत संपेपर्यंत यापैकी जे नंतर असेल ते प्रवेश करण्यास तसेच व्यवहार करण्यास मनाई करण्यात आलीय. कॅपिटल रिसर्च, कॅपर्स आणि कोर्स वर्क फोकस यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर सेबीनं नोंदणी नसलेल्या गुंतवणूक सल्लागारांच्या कथित कार्यपद्धतीच्या संदर्भात तपासणी केली. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.
सेबीविषयी...
सेबी (Securities and Exchange Board of India) हे सिक्युरिटीज आणि वित्त नियामक मंडळ आहे. 12 एप्रिल 1988मध्ये सेबीची स्थापना झाली. मुंबईतल्या वांद्र्यात मुख्यालय असून नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद इथे कार्यालयं आहेत. गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं हे महत्त्वाचं काम सेबी करते. त्याशिवाय सिक्युरिटी मार्केट विकास आणि नियमन करण्याची जबाबदारीदेखील सेबीची आहे. सेबी ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे कार्यपद्धतीला सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही.
20 विभागांमार्फत काम
एकूण 20 विभागांतर्गत सेबी आपलं कार्य करते आणि बाजारावर नियंत्रण ठेवते. या कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट रेग्युलेशन डिपार्टमेंट (CDMRD), कॉर्पोरेशन वित्त विभाग (CFD), आर्थिक आणि धोरण विश्लेषण विभाग (DEPA), डेट आणि हायब्रिड सिक्युरिटीज विभाग (DDHS), अंमलबजावणी विभाग - 1 (EFD1), अंमलबजावणी विभाग - 2 (EFD2), चौकशी आणि न्याय विभाग (EDE), सामान्य सेवा विभाग (GSD), मानव संसाधन विभाग (HRD), माहिती तंत्रज्ञान विभाग (ITD), एकात्मिक देखरेख विभाग (ISD), तपास विभाग, (IVD), गुंतवणूक व्यवस्थापन विभाग (IMD), कायदेशीर व्यवहार विभाग (LAD), बाजार मध्यस्थ नियमन आणि पर्यवेक्षण विभाग (MIRSD), बाजार नियमन विभाग (MRD), आंतरराष्ट्रीय घडामोडींचं कार्यालय (OIA), गुंतवणूकदार सहाय्य आणि शिक्षण कार्यालय (OIAE), अध्यक्ष कार्यालय (OCH) त्याचबरोबर प्रादेशिक कार्यालयं (RO's) अशा विभागांमार्फत हे कार्य चालते.