टिकटॉक, इन्स्टाग्राम, फेसबुक, शेअरचॅट या सारख्या सोशल मीडियाच्या अतिवापराने तेथील अमेरिकेतील विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या विविध पर्यायांवर सरसकट बंदीची मागणी करणारी याचिका अमेरिकेत एका मोठ्या शाळेने कोर्टात दाखल केली आहे.
वॉशिंग्टनमधील सर्वात मोठी पब्लिक स्कूल असलेल्या सिएटल पब्लिक स्कूलने टिकटॉक, युट्यूब, फेसबुक, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया कंपन्यांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. (Seattle Public Schools has filed a lawsuit against TikTok, YouTube, Facebook, Snapchat, and Instagram)
सिएटल डिस्ट्रीक्ट कोर्टमध्ये 6 जानेवारी 2023 रोजी हा खटला दाखल करण्यात आला आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सोशल मीडियाच्या अतिवापराने बिघडले असल्याचा दावा शाळेकडून करण्यात आला आहे. अमेरिकन विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची चटक लागू असून यातून विद्यार्थी आणि तरुणाईचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना जबाबदार धरुन जास्तीत जास्त दंडाची कारवाई करावी अशी मागणी या खटच्याल सिएटल पब्लिक स्कूलने केली आहे.
मानसिक आरोग्य बिघडणे हा का अपघात नाही. तर एखादी गोष्ट सातत्याने करणे किंवा ती आवडण्यासाठी कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या नवनवीन संकल्पनांमुळे विद्यार्थी वर्ग आणि तरुणाई सोशल मीडियाकडे आकर्षित झाल्याचा दावा शाळेने याचिकेत केला आहे. खटल्यासोबत शाळेत एका सर्वेक्षणाची आकडेवारी सादर केली आहे. ज्यात 2009 च्या तुलनेत 2019 मध्ये मानसिक आरोग्य बिघडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 30% ने वाढले आहे. हे विद्यार्थी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे शाळेने म्हटले आहे. यातील बहुतांश विद्यार्थी निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. त्यांच्यातील उमेद संपली असून दैनंदिन कामे करण्यास देखील ते तयार होत नाहीत, अशी निरिक्षणे शाळेने नोंदवली आहेत.
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ बिघडवण्यात टिकटॉक कंपनी आघाडीवर आहे. त्यामुळे टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. टिकटॉकमुळे युजर्सची माहिती सार्वजनिक होणे आणि एकूण मानसिक आरोग्यवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. सिएटल पब्लिक स्कूल ही वॉशिंग्टन राज्यातील मोठी सरकारी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या 106 शाळा असून त्यात जवळपास 49000 विद्यार्थी शिक्षण घेतात. सोशल मीडियाविरोधात थेट विरोध करण्याची भूमिका घेणारी सिएटल पब्लिक स्कूल ही पहिलीच अमेरिकन शिक्षण संस्था आहे.