Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Asha Scholarship चा लाखो विद्यार्थ्यांना होतोय फायदा, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

SBI Asha Scholarship

इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 15,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम हा SBI फाउंडेशनचा त्यांच्या शैक्षणिक वर्टिकल - इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) अंतर्गत एक उपक्रम आहे. या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील सातत्य सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

तुम्हांला शैक्षणिक वर्षात कुठे प्रवेश घ्यायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही आर्थिक मदतीसाठी काही योजनांची माहिती घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची ठरू शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक योजना घेऊन आली आहे. SBI फाउंडेशनच्या मदतीने भारतातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी बँक मदत करते आहे.

SBI फाउंडेशनने त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://www.sbifoundation.in वर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही योजना दरवर्षी राबवली जाते आणि शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. ही शिष्यवृत्ती योजना गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पाठबळ देते, हे विशेष.

इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 15,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येक अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्तीची रक्कम बदलू शकते हे देखील लक्षात घ्या. SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम हा SBI फाउंडेशनचा त्यांच्या शैक्षणिक वर्टिकल - इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) अंतर्गत एक उपक्रम आहे. या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील सातत्य सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

पात्रता काय?

  • पात्र अर्जदारांनी त्यांचे अर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटद्वारेच सादर करावेत असे वेबसाईटवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 
  • शिष्यवृत्तीधारकांना एका वर्षासाठी 15,000 रुपयांपर्यंत मदत केली जाते.
  • इयत्ता 6 ते 12 पर्यंत शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. 
  • विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान 75% गुण मिळवलेले असावेत. 
  • अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी भारतीय असावा.

आवश्यक कागदपत्रे कुठली?

  • मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कशीट 
  • सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड).
  • शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी मिळवलेला प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र).
  • अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील.
  • उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाकडून मिळकत प्रमाणपत्र/पगार स्लिप इ.).
  • अर्जदाराचे छायाचित्र.

SBI आशा शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?

  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे. ऑफलाइन अर्क स्वीकारले जाणार नाहीयेत. 
  • अर्ज करण्यासाठी www.sbifoundation.in या वेबसाइटला भेट द्या
  • SBI ASHA शिष्यवृत्ती लिंकवर क्लिक करा
  • तुमच्या स्क्रीनवर SBI आशा शिष्यवृत्तीचे वेब पेज दिसेल. आता, Apply Now बटणावर क्लिक करा.
  • बटणावर क्लिक केल्यानंतर, एक लॉगिन वेब पेज दिसेल. इथे तुमचा मोबाईल नंबर, इमेल आयडी देऊन नोंदणी करा.
  • विचारलेली माहिती अचूक भरा, जेणेकरून भविष्यात कुठल्या अडचणी येणार नाहीत. 
  • अर्ज भरताना कुठलीही माहिती अपूर्ण भरू नका. तुमचे शैक्षणिक तपशील, पत्ता, शाळेचे नाव इत्यादी माहिती व्यवस्थित भरा.

'अटी आणि नियम' स्वीकारा आणि 'पूर्वावलोकन' वर क्लिक करा. अर्जदाराने भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर अचूक दिसत असल्यास, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

तुमची सदर शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे किंवा नाही हे तुम्हांला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस किंवा इमेलद्वारे कळवले जाईल. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाहीये हे लक्षात असू द्या. विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती बघून फौंडेशनतर्फे विद्यार्थ्याची निवड केली जाते.