Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving Tips : 'या' टिप्सचा अवलंब करुन, महिलांनी करावी बचतीला सुरुवात

Saving Tips

Investment And Saving : आधी घरचालविण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च कुटुंबातील पुरुषच करीत असे. त्याचप्रमाणे घरातील आर्थिक बचती बाबतचे संपूर्ण निर्णय पुरुषच घेत असे. परंतु आता काळ बदलला आहे. महिला अर्थार्जन करण्यासोबतच बचत करण्याबाबतही मोठ्या भूमिका पार पाडत आहेत. मात्र, ज्यांनी अद्याप बचतीला सुरुवात केलेली नाही, त्यांच्यासाठी आज आम्ही काही टिप्स देत आहोत.

Saving Tips For Women : आजच्या युगात मोठमोठी पदे गाजविणाऱ्या महिला, बचतीला देखील तेवढेच प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. आता महिला केवळ साक्षर झाल्या नाहीत, तर बचतीबरोबरच योग्य गुंतवणूक कशी करावी? हे त्यांना कळायला लागलं आहे. आता ज्या महिला वैयक्तिक आर्थिक नियोजन सुरु करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी ते कसे करावे?, सुरुवात कुठून करावी? हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

सोन्यात गुंतवणूक फायदेशीर

सोन्यात गुंतवणूक करणे कधीपण फायदेशीर असते. परंतु, जर तुम्हाला सोन्यात नफा मिळविण्याच्या दृष्टीकोनातुन जर केवळ गुंतवणूक करायची असेल, तर सार्वभौम रोखे आणि सरकारने डिजिटल स्वरूपात जारी केलेल्या इतर योजनांमध्येही गुंतवणूक करा. अशा प्रकारे केलेली गुंतवणूक नेहमीच शंभर टक्के सुरक्षित असते. सार्वभौम बाँडचे वैशिष्ट्य असे आहे की, ते स्वस्त
असण्यासोबतच त्यावर दुप्पट परतावाही मिळतो. मुदतपूर्तीवर सोन्याच्या सध्याच्या बाजारभावासोबत 2.5 टक्के व्याजही मिळेल.

विविध ठिकाणी गुंतवणूक करा

महिलांनी त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान 50 % गुंतवणूक इक्विटीमध्ये करावी, ज्यामध्ये म्युच्युअल फंड आणि स्टॉक या दोन्हीं गोष्टींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 20 % रक्कम डेट ऑप्शन्स आणि एफडीमध्ये गुंतवावी, तर 30  %  रक्कम सोन्यात गुंतवावी.  

पीपीएफ मध्ये गुंतवणूक करा

PPF हा गुंतवणुकीचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला केवळ वार्षिक व्याजच मिळणार नाही,तर त्यात कर सूटही मिळेल. तुम्ही पीपीएफमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. त्यावर सरकारकडून सध्या 7.1  टक्के व्याज दिले जात आहे. पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे.

शेअर्स मध्ये करा गुंतवणूक

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी एक सुचना अशी आहे की, त्यांनी एका शेअरमध्ये  5 % पेक्षा जास्त गुंतवणूक करु नये. तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एसआयपी मध्ये गुंतवणूक करु शकता किंवा म्युच्युअल फंडाच्या एसआयपी पर्यायाद्वारे इक्विटीमध्येही गुंतवणूक करु शकता.

गुंतवणुकीचा सोपा पर्याय एफडी

पोस्ट ऑफिस किंवा बँकेत एफडी करुन तुम्ही त्यावर चांगले व्याज मिळवू शकता. कॉर्पोरेट एफडीला बँकेपेक्षा जास्त व्याज दिले जाते. परंतु, येथे गुंतवणूक करणे थोडे धोक्याचे आहे.

KVP मध्ये पैसे होतात दुप्पट

किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी आकर्षक गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्हाला 6.9% व्याज दिले जाते. ज्याचा मॅच्युरिटी कालावधी  9.5 वर्षांमध्ये पूर्ण होतो.

NSC गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय

जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करीत असाल, तर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये देखील पैसे गुंतवू शकता. सध्या सरकारकडून यावर 6.8 % व्याज मिळत आहे. यावर करात सूट मिळते. सध्या यामध्ये 5 वर्षे ते 10 वर्षे गुंतवणूक करता येते.