Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पोलिओची लस बनवणारी बलाढ्य फार्मा कंपनी तोट्यात; कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर

Sanofi pharma

सॅनोफी ही फ्रेंच औषध निर्मितीमधील बलाढ्य कंपनी आहे. कंपनीचे तेलंगणामधील मडचल आणि मुप्पीरेड्डीपल्ली या या दोन ठिकाणी प्रकल्प आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना काही काम नसल्याने स्वेच्छानिवृत्तीची ऑफर देऊन खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे.

औषध निर्माण क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सॅनोफीने कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर देऊ केली आहे. तेलंगणातील दोन प्रकल्पातील मिळून 800 कर्मचाऱ्यांना ही ऑफर देण्यात आली आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी जसा कर्मचारी कपातीचा धडाका लावला आहे तसेच पडसाद आता इतरही क्षेत्रांमध्ये दिसू लागले आहे. सेवा क्षेत्रासोबत उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनाही बाजारातील तीव्र स्पर्धा आणि नफ्यात कपात पाहायला मिळत आहे.

बालकांसाठी पोलिओ आणि इतर लसींचे घेते उत्पादन- (Polio and pediatric vaccine manufacturing company)

सॅनोफी ही फ्रेंच औषध निर्मितीमधील बलाढ्य कंपनी आहे. कंपनीचे तेलंगणामधील मडचल आणि मुप्पीरेड्डीपल्ली या या दोन ठिकाणी प्रकल्प आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना काही काम नसल्याने स्वेच्छानिवृत्तीची ऑफर देऊन खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे. सॅनोफी कंपनी अनेक महत्त्वाचे औषधांची भारतात निर्मिती करते. तसेच ही औषधे निर्यातही होतात. प्रामुख्याने कंपनी लहान बालकांसाठीच्या पोलीस आणि इतर लशींचे उत्पादन घेते. कोरोनानंतर फार्मा क्षेत्रात खूप झपाट्याने बदल होत असून अनेक नव्या कंपन्या स्पर्धेत उतरल्याने सॅनोफीचा नफा रोडावला आहे. हा प्रकल्प चालवणे आर्थिकदृष्या व्यवहार्य ठरत नसल्याने सेच्छानिवृत्तीची ऑफर कर्मचाऱ्यांना दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.

व्यवसाय मंदावण्याची कारणे - (Slump in Sanofi growth)

सॅनोफी कंपनी पोलिओ, कॉलरा, हिपॅटायटीस अशा महत्त्वाच्या लहान मुलांसाठीच्या लसी बनवते. मात्र, मागील काही वर्षात भारतामध्ये अनेक नव्या कंपन्या सुरू झाल्या असून त्यांच्याकडूनही या लसी बनवण्यात येतात. त्यामुळे कंपनीला कंत्राटे मिळवण्यात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. जागतिक स्तरावरील युनिसेफ संस्थेकडून कंपनीला अनेक लशींची कंत्राटे मिळायची. मात्र, मागील काही दिवसांपासून कंपनीला ही कंत्राटे मिळत नाहीत. ऑर्डर्स कमी झाल्याने कर्मचाऱ्यांना कामही नाही. 

कोरोनानंतर इतर अनेक कंपन्या औषध निर्मिती क्षेत्रात आल्या. या कंपन्यांमुळे व्यवसायातील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. त्याचा परिणाम उत्पादनांच्या किंमतींवरही झाला आहे. कोरोनाची साथ जगभर पसरली होती, तेव्हा फार्मा कंपन्या सर्वाधिक नफ्यात होत्या. मात्र, आता सर्वच कंपन्यांचा नफा कमी होत आहे. ग्लेनमार्क ही कंपनीही तोट्यात असून कंपनीचे अनेक मोठे निर्णय फसले आहेत.