दक्षिण कोरियाची तंत्रज्ञान कंपनी सॅमसंग (Samsung) ने भारतात आपला सॅमसंग गॅलक्सी एफ04 (Samsung Galaxy F04) लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन 6.5-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह येतो आणि तो ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ पी35 एसओसी (octa-core MediaTek Helio P35 SoC) द्वारे समर्थित आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग एसयू सह 5,000mAh बॅटरी आहे.
सॅमसंग गॅलक्सी एफ 04 ची किंमत भारतात
सॅमसंग गॅसक्सी एफ 04 (Samsung Galaxy F04) अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपये आहे. ग्राहक हे हँडसेट ओपल ग्रीन आणि जेड पर्पल कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन 12 जानेवारी 2023 पासून लाईव्ह विक्रीसाठी उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, लॉंच ऑफर म्हणून, ग्राहकांना आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड (ICICI Bank Credit Card) वापरताना रु. 1,000 सूट मिळू शकते. याशिवाय, जर ग्राहकांनी विक्रीच्या पहिल्या दिवशी तो खरेदी केला तर त्यांना 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. दोन्ही सवलतींचा लाभ घेतल्यानंतर, ग्राहक सॅमसंग गॅलक्सी एफ 04 हा 7,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
सॅमसंग गॅलक्सी एफ 04 चे स्पेसिफिकेशन
सॅमसंग गॅलक्सी एफ 04 (Samsung Galaxy F04) मध्ये 720x1560 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला जात आहे. हे ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ पी35 एसओसी आणि 4GB RAM सह समर्थित आहे. हा हँडसेट 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. तसेच, मायक्रोएसडी कार्ड वापरून ते 1TB पर्यंत वाढवता येते. सॅमसंग गॅलेक्सी एफ04 (Samsung Galaxy F04) अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
सॅमसंग गॅलक्सी एफ 04 कॅमेरा आणि बॅटरी
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5,000mAh ची मजबूत बॅटरी आहे जी 10W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर आहे. याच्या फ्रंटला सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.