रुपया 10 पैशांनी वधारल्यामुळ त्याचा प्रभाव सर्वच स्तरातून दिसून येणार आहे. तसेच, विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी सांगितल्यानुसार, कच्च्या तेलाच्या मजबूत किमती आणि विदेशी मार्केटमध्ये अमेरिकन चलनाच्या मजबुतीमुळे रुपया एका मर्यादित कक्षेत व्यवहार करत आहे. मात्र, देशांतर्गत शेअर मार्केटमधील तेजीमुळे रुपयाला मदत मिळाली आहे. त्यामुळेच रुपया वधारला आहे.
गुरुवारी रुपया होता नीचांकी स्तरावर
आंतरबँक परकीय चलनात, देशांतर्गत रुपया 83.13 वर उघडला आणि जे शेवटच्या बंद झालेल्या भावाच्या तुलनेत 10 पैशांची वाढ दर्शवत आहे. तसेच, रुपया गुरुवारी अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत 10 पैशांनी घसरुन आत्तापर्यंत सर्वात नीचांकी स्तरावर म्हणजेच 83.23 वर आदळला होता.
तसेच, सहा चलनांच्या तुलनेत अमेरिकन डाॅलरच्या स्थितीला दाखवणारा डाॅलर इंडेक्स 0.15 टक्क्यांनी घसरुन 104.89 वर आला आहे. याशिवाय ब्रेंट क्रूड फ्युचर्स, जागतिक ऑईल बेंचमार्क, 0.61 टक्क्यांनी घसरून 89.37 अमेरिकन डाॅलर प्रति बॅरलवर आला आहे.
शेअर बाजारात आहे तेजी
देशांतर्गत शेअर बाजारात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 168.59 अंकांनी वधारून 66,434.15 वर व्यवहार करत होता. तर एनएसईचा निफ्टी 41.80 अंकांनी वाढून 19,768.85 वर पोहोचला होता. एक्सचेंज डेटानुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदार (FII) यांनी गुरुवारी भांडवली बाजारात 758.55 कोटी किमतीचे शेअर्स ऑफलोड केले.