Cristiano Ronaldo Al Nassr: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रोनाल्डो हा पोर्तुगाल व मॅंचेस्टर युनायटेड क्लब यांच्याकडून न खेळता,आता सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबसाठी खेळणार आहे. यासाठी त्याने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महागडा करार केला असल्याचे सांगितले जाते आहे. याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
किती पैसे मिळाणार
पोर्तुगालचा फुटबॉलचा बादशाह असलेला ख्रिस्टयानो रोनाल्डो अखेर सौदी अरेबियाच्या अल-नासेर क्लबमध्ये सामील झाला आहे. या क्लबकडून खेळण्यासाठी रोनाल्डोला 17 अब्ज रूपयांपेक्षा अधिक मानधन मिळणार आहे. 2025 पर्यंत या क्लबसाठी तो खेळणार आहे. दोन वर्षांसाठी रोनाल्डोला 1800 कोटीपर्यंतचे सर्वाधिक मानधन मिळणार आहे. जे मेस्सीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
तरूण पिढीला मिळणार प्रेरणा – अल नासर
अल नासरने ही महत्पूर्ण गोष्ट पोस्ट करताना लिहिले की, आमच्या संघात रोनाल्डोचे स्वागत आहे. आमच्यात झालेला हा करार देशाला, तरूण पिढीला, मुला-मुलींना प्रेरणा देणारा आहे. तो तरूण पिढीसाठी एक आदर्श व्यक्तिमहत्व ठरणार आहे. 37 वर्षीय रोनाल्डोचा क्लबसोबत 2025 पर्यंत करार आहे. म्हणजेच दोन वर्षांसाठी रोनाल्डो या क्लबकडून खेळताना दिसेल. रोनाल्डोने सोशल मीडियावर अल नासेरची जर्सी असलेला एक फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याचा आवडता क्रमांक 7 छापलेला आहे. रोनाल्डो म्हणाला की, तो अल नासरमधून खेळण्यास उत्सुक आहे. दरम्यान, अल नासरने सौदी अरेबिया प्रो लीगचे विजेतेपद 9 वेळा जिंकले आहे. क्लबने शेवटचे हे विजेतेपद 2019 मध्ये जिंकले होते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            