Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air India Planes: एअर इंडियाने करुन दाखवलं! रोल्स रॉयल्सचं इंजिन विमानाला बसवणार

Trent XWB engines

Image Source : www.bqprime.com

Trent XWB-97 या श्रेणीतील 68 अत्याधुनिक इंजिनची ऑर्डर टाटा कंपनीने रोल्स रॉयल्सला दिली आहे. तसेच Trent XWB-84 या श्रेणीतील 12 इंजिनची ऑर्डर दिल्याच्या वृत्ताला रोल्स रॉयल्सने दुजोरा दिला आहे. लांब पल्ल्याच्या विमानांना अत्याधुनिक इंजिन्स बसवण्यात येणार आहेत.

Air India Planes: भारत सरकारकडून एअर इंडिया विकत घेतल्यानंतर टाटा समूहाने मोठे प्लॅन आखले आहेत. इंडिगो, स्पाईसजेट यासारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या विमान निर्मिती कंपन्यांकडून 470 नवी विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान खरेदीचा व्यवहार ठरला आहे. सोबतच एअर इंडियाने रोल्स रॉयल्स कंपनीला विमानांचे इंजिन बनवण्याची मोठी ऑर्डर दिली आहे. 

Trent XWB श्रेणीतील इंजिन्स -

Trent XWB-97 या श्रेणीतील 68 अत्याधुनिक इंजिनची ऑर्डर टाटा कंपनीने रोल्स रॉयल्सला दिली आहे. तसेच Trent XWB-84 या श्रेणीतील 12 इंजिनची ऑर्डर दिल्याच्या वृत्ताला रोल्स रॉयल्सने दुजोरा दिला आहे. कोणत्याही विमान वाहतूक कंपनीने दिलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असल्याचेही रोल्स रॉयल्सने म्हटले आहे.

Airbus A350-1000 या विमानांमध्ये Trent XWB-97 हे इंजिन बसवण्यात येणार आहे. तर Airbus A350-900 विमानांसाठी Trent XWB-84 हे अत्याधुनिक इंजिन बसवण्यात येणार आहे. बोईंग आणि एअरबसकडे विमांनाची ऑर्डर देताना गरजेनुसार विमानात सुविधा कंपनीकडून बनवून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत भारतातील कोणत्याही विमान कंपनीच्या विमानाला the Trent XWB श्रेणीतील इंजिन बसवण्यात आले आहे. टाटाची एअर इंडिया पहिली कंपनी ठरली आहे. प्रत्येक इंजिनची किंमत किंवा इतर माहिती देण्यात आली नाही.

कोरोनानंतर भारतामध्ये विमान वाहतूक क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. अनेक नव्या कंपन्यांकडून गुंतवणूक करण्यात येत आहे. भविष्यात भारतीय विमान कंपन्यांशी मिळून काम करण्याची इच्छा रोल्स रॉयल्स कंपनीने व्यक्त केली आहे. लांब पल्ल्याच्या मार्गासाठी उच्च क्षमता असलेली विमाने (Air India Planes) टाटा कंपनीकडून वापरण्यात येणार आहेत.

या 470 नवीन विमानांपैकी 400 हून अधिक विमाने नॅरो बॉडी जेट असतील आणि जवळपास 100 विमाने वाइड बॉडी असतील. यामध्ये Airbus A350 आणि Boeing 787 आणि 777 चा समावेश आहे. एअरबस आणि बोईंगने अद्याप या करारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. टाटा समूहाने जानेवारीमध्ये केंद्र सरकारकडून एअर इंडियाची पुन्हा खरेदी केली होती. तोट्यातील एअर इंडियाला नफ्यात आणण्यासाठी टाटा कंपनीने योजना आणखी असून त्याअंतर्गत कंपनीला नवसंजीवनी देण्यात येत आहे.