रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापक मुकेश अंबानी यांनी शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील NVIDIA या चीप मेकर कंपनीसोबत भागीदारी करण्याची घोषणा केली. अमेरिकेतील चीप मेकर NVIDIA सोबत रिलायन्स इंडस्ट्री भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI) विकसित करणार असल्याची माहिती त्यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
लँग्वेज मॉडेल विकसित करण्यावर भर
या भागीदारीतून AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ) आणि सेमी कंडक्टर चीपमधील अद्ययावत टेक्नॉलॉजी भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या भागीदारातून देशातील विविध भाषांतील स्वदेशी निर्मितीचे 'लँग्वेज मॉडेल' विकसित करण्यास मदत होईल.
भागीदारीनुसार NIVIDA जिओला CPU, GPU, नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टिम आणि ॲडव्हान्स AI मॉडेल बनवण्याचे फ्रेमवर्क अशा सर्व तांत्रिक गोष्टी देणार आहे. तर जिओ AI क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरचे मॅनेजमेंट आणि मेंटेनन्स बघेल तसेच कस्टमर एंगेजमेंटची जबाबदारीही जिओकडेच असणार आहे.
ॲडव्हान्स AI सुपर कॉम्प्युटर बनवणार
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारतात NIVIDIA सोबत कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रगतीचा विश्वास व्यक्त केला. तर NIVIDIAचे सीईओ व संस्थापक जॉनसेन हाँग यांनी भारतात ॲडव्हान्स AI सुपर कॉम्प्युटर करण्यासाठी रिलायन्सबरोबर भागीदारी करत असल्याचे सांगितले. भारतात डेटा टॅलेंट असून ॲडव्हान्स AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने रिलायन्स स्वतःचे मोठे 'लँग्वेज मॉडेल' बनवू शकते, अशी माहिती त्यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
TATA सोबत स्वतंत्र भागीदारी
दरम्यान, रिलायन्सबरोबरच NIVIDA ने टाटा समूहाबरोबरही स्वतंत्र भागीदारी जाहीर केली आहे. त्यामुळे टाटा समूहाला AI पॉवर सुपर कॉम्प्युटर्स आणि जनरेटिव्ह अप्लिकेशनचे विविध भाषांमधील प्लॅटफॉर्म तयार करायला मदत होईल. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडची TCS ही भारतातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिस इंडस्ट्री असल्याने ती ॲडव्हान्स AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने ग्राहकांसाठी क्लाउड तयार करणार आहे.