Tech Startups Loss: कोरोनानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या. या कंपन्यांमध्ये व्हेंचर कॅपिटल, एंजल इनव्हेस्टर्सने गुंतवणूकही केली. मात्र, यातील अनेक कंपन्या तोट्यात आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आता या स्टार्टअपकडे पाठ फिरवली आहे. डिसेंबर महिन्यात चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल हाती आले. यामध्ये रिलायन्सने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांसह 41 स्टार्टअप्स कंपन्या तोट्यात असल्याचे समोर आले आहे.
सलग चार क्वार्टरपासून जे निकाल हाती येत आहेत, त्यात नवतंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांनी निराशा केली आहे. दरम्यान, तोटा कमी करण्यामध्ये यातील काही कंपन्यांना यश आले आहे.
रिलायन्सने गुंतवणूक केलेल्या कंपन्या तोट्यात (Reliance backed companies Loss)
नवतंत्रज्ञान आणि टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांना मागील अनेक महिन्यांपासून नफा कमावता आला नाही. आलोक इंडस्ट्रीज, बाम्बे डाइंग अँड मॅन्युफॅक्चरिंग, Wockhardt, सुवेन लाइफ सायन्स, स्पेन्सर रिटेल, Inox Wind, सागर सिमेंट, हॉटेल ब्रँड Religare Enterprises आणि ओरिसा मिनरल डेव्हलपमेंट या कंपन्यांमध्ये रिलायन्सने गुंतवणूक केली आहे. मात्र, या कंपन्या तोट्यात आहेत. ज्या टेक्सटाइल कंपन्यांमध्ये रिलायन्सने गुंतवणूक केली आहे, त्यांची कामगिरी आणखी खराब झाली आहे.
तोटा कमी करण्यात काही कंपन्यांना यश
झोमॅटो, One 97 Communications, PB Fintech आणि डिलिव्हरी या कंपन्यांनी मागील चार तिमाहीत सलग तोटा सहन केला आहे. (Tech Startups Loss) दरम्यान, पेटीएम, पॉलिसी बाझार आणि डिलिव्हरी या कंपन्यांना तोट्याचा आकडा कमी करण्यात यश आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत One 97 Communications चा तोटा 724.20 कोटी रुपये होता. तो डिसेंबरच्या तिमाहीत 397 कोटींवर आला. मागील एक वर्षात या कंपन्यांच्या शेअर्सने गंटागळी खाल्ली आहे.
बैजू, ओयो, उडान, Eruditus, पेटीएम, फोनपे, अनअकॅडमी, फ्रेशवर्क्स, Eruditus या कंपन्याही तोट्यात आहेत. एज्येकशन क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये कोविड काळात मोठी गुंतवणूक झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर यातील अनेक कंपन्या तोट्यात गेल्या. तर काही कंपन्या बंद पडल्या.
1 रुपया कमावण्यासाठी 3 रुपये खर्च
2021 साली देशातील स्टार्टअप कंपन्यांनी 41 बिलियन डॉलर निधी उभारला होता. तर 2022 साली फक्त 24 बिलियन डॉलर निधी उभारण्यात स्टार्टअप्सला यश आले. यातून दिसून येते की, गुंतवणूकदारांनी या कंपन्यांना आर्थिक सहाय्य करण्यास नकार दिला. नव्याने सुरू झालेल्या अनेक कंपन्यांनी भविष्यातील मोठे नियोजन आखले होते, तसेच नोकरभरतीही मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र, वाढ शाश्वत नसल्याने अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली. 1 रुपया कमावण्यासाठी स्टार्टअप कंपन्यांना 3 रुपये खर्च करावे लागतात, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.