गृहकर्ज असो किंवा अन्य कोणतेही कर्ज असो त्याचे वाटप करताना बँका अर्जदाराचे वय आणि उत्पन्नाचे स्त्रोत अगोदर तपासून पाहते. नंतरच कर्जमंजुरीची प्रक्रिया सुरू होते.
* निवृत्तीवेतनधारकांचा विचार केल्यास बँका कर्ज देण्यास उदासिन असतात. जरी पेन्शन घसघशीत असली तरी वयाचा मुद्दा बँकांना महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे अशा स्थितीत पेन्शनर व्यक्तींनी बँकांच्या निकषात कसे बसता येईल, याचा विचार करायला हवा.
* निवृत्तीधारकांना गृहकर्ज मिळवताना दोन मोठे अडथळे सांगता येतील. पहिले म्हणजे उत्पन्न. वेतनाच्या तुलनेत पेन्शन खूपच कमी असते. त्यातही कुटुंबाचा घरखर्च असल्याने बँका सर्व बाजू तपासतात आणि मग गृहकर्ज मंजुर करायचे की नाही, याचा विचार करतात. त्यामुळे कर्जाची रक्कम ही खूप कमी राहते. दुसरे म्हणजे बहुतांश बँका वयाच्या साठी-पासष्ठीच्या आत गृहकर्ज फेडण्याबाबत आग्रही असतात. कधी कधी सणासुदीच्या काळात किंवा एखाद्या निमित्ताने बँका ही मर्यादा वाढवतात. अशा स्थितीत गृहकर्जाचा कालावधी दहा ते पंधरा वर्षाचा असतो. कालावधी कमी राहिल्यास साहजिकपणे हप्त्याची रक्कमही वाढते. त्यामुळे हप्ते कमी ठेवले तर गृहकर्ज मिळण्यात अडचण येत नाही. परंतु अधिक कालावधी ठेवणे हे बँकांना जोखमीचे वाटते. त्यामुळे वयाची जोखीम असूनही गृहकर्ज मिळवण्याची संधी अधिकाधिक कशी पदरात पाडून घेता येईल, याबाबत काही गोष्टी सांगता येथील.
* संयुक्त कर्जदार: निवृत्तधारकांना कर्जास पात्र ठरायचे असेल तर संयुक्तपणे कर्ज घेण्याचा विचार करावा. उदा. पत्नी, मुलगा किंवा भाऊ यांना भागीदार करून घेतल्यास बँका कर्ज देण्याचा विचार करू शकतात. कारण संयुक्त कर्जदार असले तर दोघांचे उत्पन्न संयुक्तपणे गृहीत धरले जाते आणि कर्जफेडीसही दोघेही जबाबदार मानले जातात. याशिवाय कर्जफेडीसाठी दीर्घमुदतीची सवलत देखील मिळते. प्राप्तीकरात दोघांनाही सवलत मिळते आणि कर्जासाठी जामीनदाराचीही गरज भासत नाही. तसेच जो कर्जदारहप्त्याव्यतिरिक्त रिपेमेंट करेल, त्याला करसवलतीचा लाभ मिळेल. त्यामुळे मुलगा, पत्नी यांची संयुक्त भागिदारीतून कर्ज घेण्याचा प्रक्रिया करावी, जेणेकरून कर्ज मिळवताना फारशा अडचणी येत नाहीत.
* अनेक ठिकाणी अर्ज नको: गृहकर्जाचा अर्ज बँक मंजुर करेलच की नाही, याची शाश्वती कोणालाच नसते. सेवानिवृत्तांना त्यांचे वय आणि पेन्शन लक्षात घेता गृहकर्ज मिळण्याची शक्यता कमी असते. आणि मिळाले तरी ती रक्कम समाधानकारक असते. त्यामुळे काही मंडळी अनेक बँकांत गृहकर्जासाठी अर्ज करतात. याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होण्याची शक्यता असते. कारण प्रत्येक अर्जासाठी वेगवेगळी चौकशी केली जाते आणि त्यातून आपल्यावरची विश्वासर्हता कमी होऊ शकते. त्यामुळे थेट सर्वच बँकांना अर्ज करण्यापेक्षा सहकार्याच्या मदतीने ऑनलाईनवर गृहकर्जाच्या योजना आणि पात्रता जाणून घ्यावा. अर्ज करण्याऐवजी तोंडी चौकशी करून आवश्यक माहिती गोळा करावी आणि त्यानंतरच निकषात बसणार्या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज करावा.
* कर्जाची किंमत (लोअर लोन टू व्हॅल्यू रेशो): हे गुणोत्तर प्रमाण आपल्या प्रॉपर्टीची किंमत सांगते. जर आपल्या प्रॉपर्टीची किंमत 40 लाख असेल तर बँका आपल्याला 80 टक्के म्हणजे 32 लाख रुपये कर्ज मंजूर करतात. उर्वरित 8 लाख रुपयांची व्यवस्था अर्जदाराला करावी लागते. जर कर्ज कमी मिळाले तर अर्जदाराची कर्ज मिळण्याची पात्रताही कमी होते. त्यामुळे कर्जाची किंमत वाढवण्यासाठी पात्रताही वाढवणे गरजेचे आहे.
* व्याजदराची आकारणी: गृहकर्ज तीन प्रकारे उपलब्ध होते. फ्लोटिंग, फिक्स्ड आणि व्हेरिबल व्याजदर. आजघडीला फिक्स्ड रेट देणार्या बँका खूपच कमी आहेत. त्यामुळे व्हेरिबल किंवा फ्लोटिंग रेटने कर्ज घेतल्यास कमी व्याजदराचा लाभ मिळू शकतो. याशिवाय प्रिपेमेंट केल्यास अन्य शुल्क भरण्याची देखील गरज भासत नाही. कारण फ्लोटींग रेटमध्ये प्रिपेमेंटची सुविधा असते. फिक्स्ड रेटमध्ये अधिक व्याज जाण्याचा धोका असतो. त्यामुळे सामान्य कर्जदारदेखील फ्लोटिंग लोन घेण्याबाबत आग्रही असतात. याशिवाय अन्य स्थावर मालमत्ता, मुदतठेवी, दागदागिने अर्जदाराच्या नावावर असेल, तर बँकेला परतफेडीची हमी राहते आणि कर्जाची मर्यादा देखील चांगल्या रितीने पदरात पडते.
Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
निवृत्ती धारकांना गृहकर्ज घेण्याची प्रक्रिया काय?
संबंधित पोस्ट
संबंधित पोस्ट
-
SBI Education Loan: एसबीआयकडून शैक्षणिक कर्ज घेण्याचे काय फायदे आहेत? वाचा
08 Jun, 2024 13:30 475 -
Educational Loan: लवकरात लवकर शैक्षणिक कर्ज कसे फेडायचे? जाणून घ्या या टिप्स
24 May, 2024 13:30 418 -
Education Loan: शैक्षणिक कर्ज काढताना गोंधळ उडतोय? अर्ज करण्यापूर्वी ही माहिती जाणून घ्याच
19 May, 2024 13:30 470
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण