Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Withdrawal from Mutual Funds

म्युच्युअल फंडमधून पैसे काढण्यापूर्वी पैशांची गरज किती, गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आणि त्यावर लागू होणारा टॅक्स अशा बाबीं विचारात घेऊनच पैसे काढण्याचा निर्णय घ्यावा.

गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीला मान्यता मिळू लागली आहे. तसेच सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP)मुळे हा सर्वांत लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय ठरू लागला आहे. अगदी कमीतकमी रकमेत म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करता येते. पण त्यातून पैसे काढताना मात्र थोडा विचार करूनच पैसे काढावे लागतात. कारण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. यामधून पैसे कधी आणि कसे काढावेत. यातून पैसे काढल्यानंतर त्यावर किती टॅक्स आकारला जाऊ शकतो, हे घटक लक्षात घेऊनच त्यातून पैसे काढण्याचा निर्णय घेणे उचित ठरू शकते. आज आपण म्युच्युअल फंडमधून पैसे काढताना कोणत्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे, हे जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या योजनेमध्ये पैसे गुंतवले आहेत. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण यातून पैसे काढताना सर्वप्रथम त्याचा लॉक-इन पिरिअड जाणून घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ईएलएसएस (Equity Linked Savings Scheme-ELSS) योजनेमध्ये 3 वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो. तो पूर्ण न करता तुम्ही जर त्यातून पैसे काढले तर त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. तसेच तुम्ही जर एसआयपीद्वारे गुंतवणूक केली असेल तर, पहिल्या एसआयपीला 3 वर्षे पूर्ण झाली की, तुम्ही त्यातून पैसे काढू शकता. तसेच दुसरी एसआयपी काढताना 3 वर्षे 1 महिना झाल्यानंतर काढता येईल. अशापद्धतीने म्युच्युअल फंडमधून पैसे काढता येतात. तुम्ही गुंतवणूक केलेल्या योजनेतून तुम्हाला चांगला फायदा झाला असेल तर, त्यातून लगेच पैसे काढण्याची घाई करू नका. ते पैसे तसेच म्युच्युअल फंड ठेवल्याने तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढत राहते. पण तुम्हाला जर पैसे काढायचेच असतील तर किमान 5 वर्षांनी एकरकमी पैसे म्युच्युअल फंडमधून काढल्यास तुमच्या हाती एक चांगली रक्कम येऊ शकते.

फंडच्या परताव्याचे प्रकार (Types of Mutual Fund Returns)

पैसे कसे काढता येतात?

म्युच्युअल फंडमधून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीप्रकारे पैसे काढता येतात. एसआयपीतून पैसे काढण्याच्या या पद्धतीला रिडेम्प्शन (Redemption) असे म्हणतात. तुम्ही जर ऑफलाईन पद्धतीने पैसे काढत असाल तर संबंधित म्युच्युअल फंड हाऊसच्या कार्यालयात जाऊन तिथे रिडम्प्शनचा अर्ज भरून द्यावा लागतो. तोच अर्ज ऑनलाईन पद्धतीमध्ये ऑनलाईन भरावा लागतो. या फॉर्ममध्ये गुंतवणूकदाराचे नाव, त्याचा फोलिओ क्रमांक, स्कीमचे नाव, किती युनिट्स रि़डिम करायचे, याची माहिती द्यावी लागते. हा फॉर्म भरून दिला की, 7 कामाच्या दिवसांत तुमच्या खात्यात रिडिम केलेल्या युनिट्सचे पैसे जमा होतात. 

ऑनलाईन प्रक्रियेमध्येसुद्धी हीच पद्धती वापरली जाते. फक्त यासाठी तुम्हाला कोठेही जावे लागत नाही. इंटरनेटवरून तुम्हाला अर्ज सादर करून, किती युनिट्स विकायचे आहेत. याची माहिती भरून द्यावी लागते. या प्रक्रियेतही 7 दिवसांत पैसे तुमच्या खात्यात जमा होतात.

एक्झिट लोड लक्षात घ्या!

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना प्रत्येक फंड हाऊसचा एक्झिट लोड किती आहे. हे पाहणे सुद्धा गरजेचे असते. कारण तुम्ही जेव्हा यातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला एक्झिट लोड द्यावा लागतो. म्हणजे तुम्हाला एक ठराविक शुल्क भरूनच बाहेर पडावे लागते. हा एक्झिट लोड प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळा असू शकतो आणि बहुतांशवेळा हा लोड तुम्ही जर एका वर्षाच्या आत म्युच्युअल फंडमधून पैसे काढत असाल तरच लागतो. त्यामुळे शक्यतो पैसे काढताना एक्झिट लोडचा कालावधी पूर्ण झाला आहे, याची खात्री करून पैसे काढावेत.

म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर टॅक्स किती लागतो?

म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे. यातील इक्विटी फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल तर एका वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीवर 10 टॅक्स आकारला जाऊ शकतो. तर गुंतवणूक सुरू केल्यापासून 3 वर्ष झाल्यानंतर त्यावर 20 टक्के टॅक्स आकारला जातो. त्यामुळे यातून पैसे काढण्यापूर्वी तुम्ही जे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याची पूर्तता होत आहे का? हे लक्षात घेऊनच यातून पैसे काढण्याचा निर्णय घेणे उचित ठरू शकते.