दरवर्षी जानेवारी सुरु झाला की कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी अनेकजण कोणत्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीममध्ये (ईएलएसएस) गुंतवणूक करावी या विचारात असतात. मात्र अशा गुंतवणूकदारांनी ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताना पुढची किमान तीन वर्षे तरी त्यांची कामगिरी कशा प्रकारे होत आहे याची काळजी त्यांनी करू नये असा सल्वा जाणकारांकडून दिला जातो.
ईएलएसएसमध्ये आवश्यकता असेल तरच गुंतवणूक करा. प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी ईएलएसएस हा फक्त एक पर्याय आहे. कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ), शाळेची फी, जीवन विमा प्रीमियम अशा पर्यायांचा वापर करून 1.50 लाख रूपयांची मर्यादा पूर्ण करू शकतात. ईपीएफ हा स्वयंरोजगारीत लोकांसाठी उपलब्ध नसला तरी इतर सर्व पर्याय उपलब्ध
आहेत.
Table of contents [Show]
तुमच्या मालमत्तांचे वर्गीकरण पाहा
ईएलएसएसमधील गुंतवणुकीला तुमच्या समभाग मालमत्ता विभाजनाचा भाग म्हणून समजा. तुम्ही समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आधीच केलेली असल्यास (थेट समभाग किंवा इतर समभाग निधींद्वारे) तर तुम्हाला कर बचत करण्यासाठी ईएलएसएसचा पर्याय निवडण्याची गरज नाही. तुम्ही टॅक्स सेव्हर बँक फिक्स्ड डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड इत्यादी कर्जाशी संबंधित
पर्यायांची निवड करू शकता.
एसआयपीचा पर्याय निवडू शकता
तुम्हाला तुमच्य धोरणात्मक समभाग वितरणाचा भाग म्हणून ईएलएसएसचा विचार करायचा असल्यास संपूर्ण वर्षभरात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) गुंतवणूक करणे उत्तम ठरेल. तुम्ही ईएलएसएसचा पर्याय घ्यायचा ठरवले असल्यास प्रत्येक वर्षी वेगवेगळा निवडायची गरज नाही. उत्तम फंड मॅनेजर्सकडून दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्डसह चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना उपलब्ध आहेत. इतर बाबी चांगल्या असेपर्यंत तुमच्या विद्यमान गुंतवणुकीत भर घालण्यात काहीही धोका नाही.
बाजाराच्या विद्यमान स्थितीकडे दुर्लक्ष करा
ईएलएसएस ही तीन वर्षांसाठी लॉक केलेली असते. या तीन वर्षांच्या कालावधीत बाजारात चढउतार होऊ शकतात. त्यामुळे अलीकडेच इंडेक्स कमी झाला (किंवा वाढला) आहे म्हणून ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करणे किंवा न करणे ही गोष्ट समस्येकडे पाहण्याची उत्तम पद्धत नाही.
तुमच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करा
तुम्ही असे ठरवले आहे की तुमच्याकडे ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत. या पैशांची गरज पुढच्या तीन वर्षांत पडेल असे तुम्हाला वाटते का? तुमचे उत्तर होकारार्थी असल्यास ईएलएसएसमध्ये रक्कम अडकवण्यापेक्षा प्राप्तीकर भरून उर्वरित रक्कम वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे. ईएलएसएसमध्ये गुंतवलेले पैसे कोणत्याही कारणासाठी आधीच काढता येणार नाहीत.