Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund investment and Tax : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर टॅक्स कसा आकारला जातो?

Mutual Fund investment and Tax

Mutual Fund investment and Tax : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर वेगवेगळ्या दराने टॅक्स आकारला जातो. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला त्यावर आकारल्या जाणाऱ्या टॅक्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करत असल्यास, तुमच्या उत्पन्नावर कसा टॅक्स आकारला जातो ते आपण जाणून घेणार आहोत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला जे काही व्याज आणि नफा मिळतो. तो गुंतवणूकदारला कशाप्रकारे आणि किती मिळतो. यावर आधारित वेगवेगळ्या दराने त्यावर टॅक्स (Tax) आकारला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला त्यावर आकारल्या जाणाऱ्या टॅक्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तसेच गुंतवणूकदाराला झालेला भांडवली नफा म्हणजे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक काढून घेतल्यावर झालेला नफा. त्यावर टॅक्स आकारताना ती गुंतवणूक कशात केली आहे. किती काळ केली आहे, हे पाहिले जाते. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक आणि त्यावर कशापद्धतीने टॅक्स आकारला जातो. तसेच गुंतवणूकदाराला या उत्पन्नाच्या आधारे इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return-ITR) कसा भरावा लागतो, याबाबत जाणून घेऊयात.

म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर खालील घटकांद्वारे उत्पन्न मिळते

नियमित लाभांश (Regular Dividend)

शेअर्सच्या विक्रीतून मिळणारा भांडवली नफा आणि त्यावर टॅक्स कसा आकारला जातो, हे समजून घेऊया.

लाभांश (dividend) 

गुंतवणूकदारांना मिळालेला लाभांश त्यांच्या करपात्र उत्पन्नात जोडला जातो आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या संबंधित आयकर स्लॅब दरांवर टॅक्स आकारला जातो. कंपनीला अपेक्षित फायदा झाला की, किंवा कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर सर्वानुमते निर्णय घेऊन गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर करतात. सध्या एका आर्थिक वर्षात 10 लाखापर्यंतचा लाभांश टॅक्स फ्री आहे.

भांडवली नफा (Capital Gains) 

म्युच्युअल फंडातील भांडवली नफ्याचा टॅक्स रेट हा गुंतवणूकदाराचा होल्डिंग कालावधी आणि म्युच्युअल फंडाच्या प्रकारावर अवलंबून असतो. गुंतवणूकदाराने भांडवल कोणत्या फंडमध्ये गुंतवले आहे, जसे की, इक्विटी, हायब्रिड किंवा डेब्ट फंडमध्ये. तसेच ते किती काळ गुंतवले आहे; यावर अवलंबून असते. 

फंडचे प्रकार (Type of Fund)

डेब्ट आणि इक्विटी फंड (Debt and Equity Funds) 

डेब्ट फंड हा म्युच्युअल फंडचाच एक प्रकार आहे. या फंडच्या पोर्टफोलिओमधील एकूण गुंतवणुकीपैकी 65 टक्के रक्कम ही डेब्ट स्कीमसमध्ये तर इक्विटी म्युच्युअल फंडमधील 65 टक्के रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवली जाते. हायब्रीड फंडच्या पोर्टफोलिओमधील गुंतवणूक डेब्ट आणि इक्विटी अशा दोन्ही स्कीमसमध्ये गुंतवणूक करतात.

खालील तक्त्यावरून अल्पकालीन भांडवली नफा आणि दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी किती कालावधी गृहित धरला जातो. त्याचे अंदाज देण्यात आले आहेत.

फंडप्रकार(Fund Type)

अल्पकालीनभांडवलीनफा

(Short Term Capital Gains)

दीर्घकालीन  भांडवली  नफा

(Long Term Capital Gains)

इक्विटी   फंड

12  महिन्यांपेक्षा   कमी

12  महिने   आणि   अधिक

डेट   फंड

36  महिन्यांपेक्षा   कमी

36  महिने   आणि   जास्त

हायब्रीड   इक्विटी   ओरिएंटेड   फंड

12  महिन्यांपेक्षा   कमी

12  महिने   आणि   जास्त

हायब्रीड   डेट - ओरिएंटेड   फंड

36  महिन्यांपेक्षा   कमी

36  महिने   आणि   त्याहून   अधिक   काळ

जेव्हा तुम्ही 36 महिन्यांच्या होल्डिंग कालावधीत तुमच्या डेब्ट फंड युनिट्सची पूर्तता करून अल्प-मुदतीचा भांडवली नफा मिळवता, तेव्हा हा नफा तुमच्या करपात्र उत्पन्नात जोडला जातो. ते उत्पन्न आणि तुमचा इन्कम टॅक्स स्लॅब याची सांगड घालून त्यावर टॅक्स आकारला जातो. जेव्हा तुम्ही 36 महिन्यांच्या होल्डिंगनंतर डेब्ट फंडमधील युनिट्सची विक्री करून दीर्घकालीन भांडवली नफा मिळवता, तेव्हा त्या नफ्यावर इंडेक्शननंतर 20 टक्के दराने टॅक्स आकारला जातो.

जेव्हा तुम्ही तुमच्या इक्विटी फंड युनिट्सची पूर्तता करून 12 महिन्यांच्या होल्डिंग कालावधीत अल्पकालीन भांडवली नफा मिळवता. तेव्हा त्यावर सरसकट 15 टक्के टॅक्स भरावा लागतो. जेव्हा तुम्ही तुमच्या इक्विटी फंड युनिट्सची विक्री करून 12 महिन्यांच्या होल्डिंग कालावधीनंतर दीर्घकालीन भांडवली नफा मिळवता, तेव्हा त्यावर कशापद्धतीने टॅक्स आकारला जातो, ते आपण पाहुया.

फंडप्रकार(Fund Type)

अल्पकालीनभांडवलीनफा

(Short Term Capital)

दीर्घकालीनभांडवलीनफा

(Gains Long Term Capital Gains)

इक्विटी   फंड  

इक्विटी   फंड 15% +  उपकर  

अधिभार   वर्षाला लाख   रुपयांपर्यंत   करमुक्त   आहे रु . 1  लाखापेक्षा   जास्त   कोणत्याही   नफ्यावर 10% +  उपकर अधिभार   कर   आकारला   जातो

डेब्ट   फंड

गुंतवणूकदाराच्या   आयकर   स्लॅब   रेटवर

20% +  उपकर अधिभारानुसार   कर   आकारलेले

हायब्रीड   इक्विटी - ओरिएंटेड   फंड

फंड 15% +  उपकर अधिभार   वर्षाला लाख   रुपयांपर्यंत   कर - सवलत   आहे .

रु . 1  लाखापेक्षा   जास्त   कोणत्याही   नफ्यावर 10% +  उपकर अधिभार   कर   आकारला   जातो

हायब्रीड   डे ब्ट - ओरिएंटेड   फंड

गुंतवणूकदाराच्या   आयकर   स्लॅब   दराने

20% +  उपकर अधिभारावर   कर   आकारला   जातो

टॅक्स आकारणी : वर्षाला 1 लाख रुपयांपर्यंतचा भांडवली नफा टॅक्स फ्री आहे. 1 लाखापेक्षा अधिकच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10 टक्के दराने LTCG टॅक्स लागू होतो.