मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने भारताचे प्रतिष्ठित पेय ब्रँड कॅम्पा पुन्हा लाँच करण्यात आला आहे. कॅम्पा या 50 वर्षीय ब्रँडकडून रिलायन्ससोबत करार केल्यानंतर भारतीय पेय बाजारात पुनरागमन केले आहे. सुरुवातीला कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज बाजारात दाखल होणार आहेत. कंपनीकडून याला 'द ग्रेट इंडियन टेस्ट' असे नाव देण्यात आले आहे.
रिलायन्सकडून पेप्सी आणि कोका कोलाला थेट स्पर्धा
रिलायन्सकडून पेप्सी आणि कोका कोलाला थेट स्पर्धा होणार आहे.भारतीय ब्रँड कॅम्पा बाजारात लॉन्च करून रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जगातील दोन सर्वात मोठ्या कंपन्या पेप्सिको आणि कोका-कोला यांना भारतीय पेय बाजारात आव्हान देण्यात आले आहे. कॅम्पा पेप्सिको आणि कोका-कोलाच्या बाजारातील वाटा थेट कमी करेल, असे मार्केट तज्ज्ञांचे मत व्यक्त झाले आहे. रिलायन्स भारतातील स्वतःच्या रिटेल चेनच्या आधारे या दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी पुढे आली आहे.
कॅम्पाचा नवा लूक ग्राहकांच्या नवीन पिढीकडून स्वीकारला जाईल असा विश्वास कंपनीला आहे. लॉन्च प्रसंगी बोलताना, RCPL चे प्रवक्ते म्हणाले, “कॅम्पाच्या नवीन अवतारात सादर करून, आम्हाला आशा आहे की ग्राहकांची पुढची पिढी हा आयकॉनिक ब्रँड स्वीकारेल. “तरुण ग्राहकांना नवीन कॅम्पाची चव आवडेल. वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेतील खप जास्त असल्याने कॅम्पासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत, असे सांगण्यात आले.
कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज लाँच
कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज लाँच केले आहे. 200, 500 आणि 600 ml च्या पॅक व्यतिरिक्त, रिलायन्स एक आणि दोन लिटरच्या फॅमिली पॅकमध्ये देखील मोहीम सुरू करत असून RCPL ने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पासून सुरू होऊन संपूर्ण भारतात आपला कोल्ड बेव्हरेज पोर्टफोलिओ लॉन्च केला आहे. भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची उत्पादने सेवा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. RCPL चे प्रवक्ते यांनी कॅम्पाच्या नवीन अवतारात सादर झाल्यानंतर ग्राहकांची पुढची पिढी हा आयकॉनिक ब्रँड स्वीकारेल असा आशावाद व्यक्त केला आहे. तसेच तरुण ग्राहकांना नवीन कॅम्पाची चव आवडेल, असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे रिलायन्सकडून पेप्सी आणि कोंका कोलाला थेट स्पर्धा निर्माण झाली आहे.