शेअर बाजारात बिग बूल या नावाने प्रसिद्ध असेलेले राकेश झुनझुनवाला यांनी स्टॉक मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक त्यांच्या निधनानंतर पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या मालकीची झाली. झुनझुनवाला यांचे काही कंपन्यांमध्ये फक्त मोजके शेअर्स नाहीत तर मोठी हिस्सेदारी देखील आहे. जाणून घेऊया स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक व एकूण संपत्ती.
गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यामुळे शेअर बाजारात हालचाल बघायला मिळाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला यांची काही नामवंत कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. यातील एक कंपनी मेट्रो ब्रँड व स्टार हेल्थ इन्शुरन्स या दोन शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ बघायला मिळाली आहे. शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 650 कोटींपर्यंत वाढली आहे.
रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत वाढ (Rekha Jhunjhunwala's Wealth Rise)
गेल्या एका महिन्यात, स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरची किंमत 530.95 रुपयांनी वाढून 578.05 पर्यंत पोहोचली आहे, या कालावधीत प्रति शेअर 47.10 वाढ झाली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 10,07,53,935 स्टार हेल्थ इन्शुरन्सचे शेअर्स असल्याने, स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाल्यामुळे रेखा झुनझुनवाला यांच्या नेट वर्थमध्ये सुमारे रूपये 475 कोटी इतकी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या एका महिन्यात मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्सची किंमत 45.70 रुपये प्रति शेअर वाढली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँडचे 3,91,53,600 शेअर्स असल्याने, मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या नेट वर्थमध्ये सुमारे 179 कोटी इतकी वाढ झाली आहे.
श्रीमंतांच्या यादीत 30वे स्थान (30th Place In Rich List)
राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर रेखा या चर्चेत आहेत कारण श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 30वे स्थान मिळवले आहे. त्यांच्या पोर्टफोलिओत स्टार हेल्थ इन्शुरन्स, टायटन व मेट्रो ब्रँड यांचा समावेश आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे एकूण 47,659 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
रेखा झुनझुनवाला यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी (Some special facts about Rekha Jhunjhunwala)
- रेखा झुनझुनवाला यांना त्यांचे दिवंगत पती राकेश झुनझुनवाला यांच्याकडून एक मौल्यवान स्टॉक पोर्टफोलिओ वारसा मिळाला.
- पोर्टफोलिओमध्ये सर्वात मौल्यवान सूचीबद्ध होल्डिंग म्हणजे घड्याळ आणि दागिने बनवणारी कंपनी टायटन, टाटा समूहाचा भाग आहे.
- राकेश झुनझुनवाला यांनी मृत्यूच्या काही काळापूर्वी 'अकासा' एअरलाइन्सची मुहूर्तमेढ केली होती. त्यांच्या निधनानंतर पत्नी रेखा आता पुढील कार्यभार सांभाळतील.