Agniveer Recruitment 2022 : केंद्र सरकारने मागील आठवड्यात सैन्यातील भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना (Agneepath Scheme Indian Army) जाहीर केली होती. या योजने अंतर्गत वायुदलातील भरतीसाठी आजपासून (दि. 24 जून) अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. वायुदलात या योजनेद्वारे सहभागी होणाऱ्या जवानांना ‘अग्निवीर वायू’ असे नाव देण्यात आले आहे.
वायुदलातील भरतीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 5 जुलै, 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in आणि https://indianairforce.nic.in/ या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 23 वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 या दरम्यान जन्मलेले उमेदवार (Agneepath Scheme Age Eligibility) अर्ज करू शकतात.
आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू
आजपासून इच्छुक उमेदवार वर नमूद केलेल्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. ही प्रक्रिया 5 जुलै, 2022 पर्यंत सुरू असणार आहे. अर्ज भरताना भरतीचे शुल्क 250 रूपये आहे. ते ऑनलाईन बॅंकिंगद्वारे भरता येते.
शैक्षणिक पात्रता काय?
विज्ञान शाखेच्या उमेदवारांना गणित आणि इंग्रजी विषयांहस उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तसेच गणित आणि इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुण असावेत. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर कोणत्याही शाखेतून किमान 50 टक्क्यांसह 12वी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी अर्ज करू शकतो.
आवश्यक कागदपत्रे
- दहावी/बारावीची गुणपत्रिका
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- फोटो ओळखपत्र
- मोबाईल क्रमांक
- स्कॅन केलेला डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
- सहीचा स्कॅन केलेला फोटो
- पालकांच्या सहीचा स्कॅन केलेला फोटो