Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Onam Kerala: केरळात ओणम सणाच्या पहिल्या नऊ दिवसांत 665 कोटी रुपयांची मद्यविक्री

liquor sale In Onam

Image Source : www.thehansindia.com

केरळमध्ये ओणम सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. चालू वर्षी राज्यात पहिल्या नऊ दिवसांत 665 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. मद्यविक्रीने मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. ओणमच्या नवव्या दिवशी सर्वाधिक मद्यविक्री झाली.

Onam Festival: सबंध केरळ राज्यात सध्या ओणम सण उत्साहात साजरा केला जातोय. खरीप हंगामातलं पिक हाती आल्यानंतर ओणम ची तयारी केली जाते. वर्षातून एकदा राजा महाबली त्याच्या साम्राज्यात माघारी येतो, असे समजलं जाते. ओणम सणामध्ये महाबली राजाच्या आगमनाचा आनंद साजरा केला जातो. ओणमच्या पहिल्या 9 दिवसांत केरळ राज्यात 665 कोटी रुपयांचे मद्य विक्री झाले.

रेकॉर्ड ब्रेक मद्यविक्री 

मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी मद्याची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली. त्यामुळे मद्याचे प्याले रिचवत केरळवासीयांनी सणाचा आनंद लुटल्याचं दिसून आलं. (liquor sale in Kerala)  ओणम सणाचा 9 वा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. काही भागात 9 व्या दिवसापासून खरा सण सुरू होतो. चालू वर्षी 665 कोटी रुपयांचे मद्य विक्री झाले. मागील वर्षी पहिल्या नऊ दिवसांत 624 कोटी रुपयांचे मद्य विक्री झाले होते. 

सरकारी दुकानांतून कोट्यवधींची विक्री 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ओणम सणाच्या नवव्या दिवसाला उत्तरधाम असे म्हटले जाते. राज्यातील अनेक भागात या दिवसापासून ओणम सणाला सुरुवात होते. या दिवशी राज्यात सर्वाधिक म्हणजे 116 कोटी रुपयांचे मद्य सरकारी मद्यविक्री दुकानांतून झाले. खासगी दुकानांसोबत Kerala State Beverages Corporation’s (Bevco) या सरकारी दुकानांद्वारेही मद्यविक्री केली जाते. काही मोठ्या जिल्ह्यातील सरकारी मद्यविक्री दुकानांतून एका दिवसात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मद्यविक्री झाली. 

सरकारी उत्पन्नात भर 

चालू वर्षी मद्यविक्रीतून सरकारी महसूलातही मोठी भर पडली. (Onam Festival celebration) मागील तीन वर्षांपासून मद्यविक्रीत सलग वाढ दिसून येत आहे. दरम्यान, सरकारी तिजोरीत नक्की किती महसूल जमा झाला याची आकडेवारी समोर आली नाही. मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी ओणम सणाची सांगता झाली.