Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate : न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि लिस्बन सारख्या शहरांची भारतीय श्रीमंतांना भुरळ

Real Estate

Image Source : www.india.postsen.com

दिल्ली एनसीआर, मुंबई, गोवा आणि बंगळुरू ही श्रीमंत लोकांसाठी लक्झरी रिअल इस्टेट (Real Estate) खरेदी करण्यासाठी टॉप 4 शहरं असली तरी नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की भारतीय श्रीमंत न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि लिस्बन सारख्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत.

फक्त तुम्ही आम्हीच नाही तर भरपूर पैसे असलेले श्रीमंत लोकही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक (Real Estate Investment) करणे हे एक चांगले गुंतवणुकीचे ठिकाण मानतात. येत्या दोन-तीन वर्षांत हे क्षेत्र चांगले काम करेल, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, या क्षेत्रातील परतावा महागाईवरही मात करण्यास सक्षम असेल. म्हणूनच हे लोक हाय राइज अपार्टमेंट्स, फार्म हाऊस आणि हॉलिडे होम्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टीच्या वार्षिक लक्झरी आउटलुक सर्वेक्षण 2023 द्वारे हे उघड झाले आहे.

श्रीमंतांची कशाला पसंती?

2023-24 मध्ये 61 टक्के उच्च नेटवर्थ व्यक्ती किंवा एचएनआय आणि अल्ट्रा हाय नेटवर्थ व्यक्तींसाठी (UNHI) रिअल इस्टेट हे आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण असल्याचे आऊटलूक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. यापैकी 34% लोक हाय-राईज अपार्टमेंट्समध्ये आणि 30% लोक फार्म हाऊस आणि हॉलिडे होम्समध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 23% श्रीमंत लोकांनीही चांगले भाडे देणार्‍या व्यावसायिक रिअल इस्टेटला प्राधान्य दिले. संधी मिळाल्यास त्यात गुंतवणूक करायला आवडेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

लक्झरी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे कारण

इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टीचे सीईओ अमित गोयल म्हणतात की एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या भांडवलात वाढ होते तेव्हाच मालमत्ता खरेदी करते. 2023-24 या वर्षाकडे पाहता, जीवनशैलीत सुधारणा हे मालमत्ता खरेदीचे मुख्य कारण राहिले. विशेष म्हणजे, सर्वेक्षण केलेल्या 12% श्रीमंतांनी मल्टी-जनरेशनल संपत्ती निर्माण करण्यासाठी मालमत्ता वर्ग म्हणून रिअल इस्टेटची निवड केली. आपल्या नातेवाईकांनाही ते ही प्रॉपर्टी हस्तांतरित करु शकतात.

श्रीमंतांना खरेदी करायचीय आलिशान मालमत्ता

दिल्ली एनसीआर, मुंबई, गोवा आणि बंगळुरू ही श्रीमंत लोकांसाठी लक्झरी रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी टॉप 4 शहरे आहेत. आणखी एक मनोरंजक आकडेवारी अशी आहे की भारतातील 11 टक्के श्रीमंत परदेशात रिअल इस्टेटच्या शोधात आहेत. तर, 2021 च्या शेवटी जेव्हा इंडिया सोथबीजने असेच सर्वेक्षण केले तेव्हा परदेशातील मालमत्तेमध्ये फारसा रस नव्हता. महामारीची भीती कमी होत असताना श्रीमंत भारतीय न्यूयॉर्क, मियामी, लंडन, दुबई आणि लिस्बन सारख्या गेटवे शहरांमध्ये लक्झरी अपार्टमेंट खरेदी करण्याचा विचार करत आहेत.