Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Penalty on 3 Banks: आरबीआयने या 3 मोठ्या बँकांना ठोठावला कोट्यवधींचा दंड! तुमचं खातं आहे का या बँकेत?

RBI Penalty on 3 Banks

Image Source : www.in.pinterest.com

RBI Penalty on 3 Banks: रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 2 मोठ्या बँकांचा समावेश.

RBI Imposes Monetary Penalty on SBI: रिझर्व्ह बँकेने पंजाब ॲण्ड सिंध बँकेसह स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेवर नियमांचे पालन न केल्यामुळे दंड ठोठवला आहे. कर्जाशी संबंधित आरबीआयने घालून नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे एसबीआय बँकेवर 1.3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात कर्ज आणि केवायसी प्रक्रियेच्या नियमात दिरंगाई केल्याबद्दल आरबीआयने इंडियन बँकेवर 1.6 कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे.

पंजाब ॲण्ड सिंध बँकेने ठेवींदारांशी संबंधित एज्युकेशनल आणि अवेरनेस (Educational & Awareness Fund) फंडाशी संबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे आरीबीआयने या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर Fedbank Financial Services Ltd. बँकेवर 8.80 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकेने नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांमधील फसवणूक रोखण्या संदर्भात नियमांचे पालन न केल्याचे दिसून आल्याने ही कारवाई केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

त्याचबरोबर आरबीआयने मुंबईतील द कपोल को-ऑप. बँकेचा परवानाही रद्द केल्याची माहिती दिली आहे. कपोल बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आणि त्यातून बँकेला काहीच उत्पन्न मिळत नसल्याचे आरबीआयच्या लक्षात आल्याने आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बँकांवर ही कारवाई करताना स्पष्ट केले आहे की, नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवरच ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.