Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयची रेपो दरवाढ आणि त्याचा परिणाम!

आरबीआयची रेपो दरवाढ आणि त्याचा परिणाम!

आरबीआयने रेपो दरात वाढ (RBI repo rate hike) केल्याने एकूणच बॅंकांचे सर्व प्रकारचे कर्ज महागले. पण त्याचबरोबर मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ झाली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) जूनमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात (Repo Rate) 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी लगेच होम लोनचे व्याजदर (Interest on Home Loan) वाढवले. रेपो दरवाढीमुळे बॅंकिंग यंत्रणेवरसुद्धा मोठा परिमाण ताण येऊ लागला आहे. यामुळे बॅंकांचा कर्ज वितरणाचा वेग मंदावला आहे. एकूणच बॅंकांचे सर्व प्रकारचे कर्ज महागले. पण त्याचबरोबर मुदत ठेवींवरील व्याजदरात ही बॅंकांकडून वाढ करण्यात आली. 

महिन्याभरात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ!

RBI ने गेल्या 36 दिवसात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली. यापूर्वी आरबीआयने 0.40 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. तर जूनमध्ये 0.50 बेसिस पॉईंटने वाढ केली. यामुळे रेपो दर 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयच्या रेपो दरवाढीनंतर देशातील प्रमुख बॅंका आयसीआयसीआय बॅंक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेसह अनेक बॅंकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.

सर्व कर्जे महागली, EMI वाढला

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. यामुळे जुन्या कर्जदारांच्या EMI मध्ये वाढ होणार आहे. आरबीआयकडून बॅंकांना वाढीव दराने कर्ज मिळू लागले की, बँकाही त्यांच्या व्याजदरात वाढ करतात. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.

मुदत ठेवींवर मिळणार जास्त व्याज!

RBI च्या निर्णयामुळे कर्जे महागली; त्याप्रमाणेच मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याजदरातही वाढ झाली आहे. तुम्ही जर नवीन एफडी करणार असाल तर ती दीर्घ कालावधीऐवजी कमी कालावधीसाठी करा, असा सल्ला वित्तीय सल्लागारांकडून दिला जातो.

रेपो दर वाढवणे किंवा कमी करणे, हा आरबीआयच्या धोरणात्मक बाबींपैकी एक महत्त्वाचा भाग मानला जातो. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी बाजारातील चलनवाढ कमी करणे आवश्यक असते. ती कमी करण्यासाठी आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे.