नवीन आर्थिक धोरणाची घोषणा करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikant Das) म्हणाले की, लवकरच आरबीआय यासाठी पायलट प्रोजेक्ट (Pilot Project) सुरू करणार आहे. हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास बँकांना अशी मशिन बसवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे देखील ते म्हणाले.
Table of contents [Show]
UPI सह पेमेंट करण्यास सक्षम मशीन
क्यूआर कोडवर (QR Code) आधारित कॉईन व्हेंडिंग मशीन देशातील 12 विविध शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ताज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) MPC बैठकीत घोषणा केली की 12 शहरांमध्ये लवकरच QR कोड आधारित कॉइन वेंडिंग मशीन असतील. RBI गव्हर्नर म्हणाले की यामुळे नाणी मिळवणे आणि मशीन वापरून नाणी वितरित करणे सुलभ होईल. कॉइन व्हेंडिंग मशीन ही स्वयंचलित मशीन आहेत जी बँक चलनी पैशांच्या बदल्यात नाणी वितरीत करेल.
ही यंत्रे कशी काम करतील?
RBI गव्हर्नर यांच्या विधानानुसार, हे व्हेंडिंग मशीन, चलनी नोटांऐवजी UPI वापरून ग्राहकाच्या खात्यातून पैसे घेतील आणि त्याच मूल्याची नाणी ग्राहकांना देतील. त्यामुळे नाण्यांची उपलब्धता सुलभ होईल. प्रस्तावित पायलट प्रोजेक्टमधून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे, या मशीन्सचा वापर करून नाण्यांच्या वितरणास प्रोत्साहन देण्यासाठी सर्व बँकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, अशी महिती देखील त्यांनी दिली.
RBI proposes to launch pilot project for QR code-based coin vending machine in 12 cities
— ANI Digital (@ani_digital) February 8, 2023
Read @ANI Story | https://t.co/WWEgR5XJc0#RBI #PilotProject #QRCode #CoinVendingMachine #12Cities pic.twitter.com/xW80SSTne8
UPI ची व्याप्ती वाढणार
आरबीआयने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सुविधेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सुरुवातीला ही सुविधा G20 देशांतील प्रवाशांसाठी असेल. परदेशी नागरिकांना भारतात व्यवहार सोपे व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. UPI चा वापर करून सुट्टी नाणी मिळवणे आता परदेशी नागरीकांसाठी देखील सुलभ होणार आहे. परंतु या सुविधेला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. कारण शहरी भागात UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे छोट्या-मोठ्या खरेदीसाठी देखील आता सर्रास डिजिटल पेमेंट केले जाते. अनेकदा सुट्टे पैसे नाहीत म्हणून देखील सरळ UPI पेमेंट ग्राहक करताना दिसतात. म्हणजेच सुट्ट्या पैशांना पर्याय म्हणून UPI पेमेंट सुविधा वापरण्याची सोय असताना लोक कॉईन वेंडिंग मशीन वापरून चिल्लर का घेतील हा देखील प्रश्न आहे. परंतु या योजनेची नेमकी उपयुक्तता पायलट प्रोजेक्ट नंतरच समजणार आहे.
PhonePe ने दिली आहे UPI ची सुविधा
परदेशी नागरिकांना भारतात पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा फॉरेक्स कार्डची (Forex Card) गरज भासणार नाहीये. अशी सुविधा देणारे PhonePe हे देशातील पहिले फिनटेक प्लॅटफॉर्म ठरले आहे. इंटरनॅशनल डेबिट कार्डाप्रमाणेच याचे व्यवहार चालतील आणि वापरकर्त्याच्या बँक खात्यातून परकीय चलन कापले जाईल, असे कंपनीतर्फे याआधीच जाहीर करण्यात आले आहे.
UPI व्यवहारांच्या संख्येनुसार सर्वाधिक वापरले जाणारे मोबाईल ऍप PhonePe आता आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्यास देखील सक्षम असणार आहे. या सुविधेद्वारे परदेशात प्रवास करणारे भारतीय UPI वापरून परदेशी व्यापाऱ्यांना पैसे देऊ शकतील. यामुळे अशी सुविधा असणारे हे देशातील पहिले फिनटेक प्लॅटफॉर्म ठरले आहे. इंटरनॅशनल डेबिट कार्डाप्रमाणेच याचे व्यवहार चालतील आणि वापरकर्त्याच्या बँक खात्यातून परकीय चलन कापले जाईल, असे देखील कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सुरुवातील G 20 देशांतील नागरिकांसाठी ही सुविधा दिली जाणार आहे. म्हणजेच काय तर डिजिटल पेमेंटची व्याप्ती वाढवून सुलभ व्यवहार करण्यासाठी लोकांना सोयीसुविधा पुरविण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे.