UPI व्यवहारांच्या संख्येनुसार सर्वाधिक वापरले जाणारे मोबाईल ऍप PhonePe आता आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्यास देखील सक्षम असणार आहे. या सुविधेद्वारे परदेशात प्रवास करणारे भारतीय UPI वापरून परदेशी व्यापाऱ्यांना पैसे देऊ शकतील. यामुळे अशी सुविधा असणारे हे देशातील पहिले फिनटेक प्लॅटफॉर्म ठरले आहे. इंटरनॅशनल डेबिट कार्डाप्रमाणेच याचे व्यवहार चालतील आणि वापरकर्त्याच्या बँक खात्यातून परकीय चलन कापले जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
कंपनीच्या मते, UAE, सिंगापूर, मॉरिशस, नेपाळ आणि भूतान मधील सर्व आंतरराष्ट्रीय व्यापारी आउटलेट ज्यांना स्थानिक QR कोड आहे अशा ठिकाणी हे ऍप काम करेल.
PhonePe वापरकर्ता ऍपवर UPI इंटरनॅशनलसाठी UPI शी लिंक केलेले बँक खाते सक्रिय करू शकतात. कंपनीने म्हटले आहे की हे एकतर ते पेमेंट करू इच्छित असलेल्या ठिकाणी किंवा ट्रिपच्या आधी केले जाऊ शकते आणि सेवा सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्याने UPI पिन प्रविष्ट करणे आवश्यक आहे. या सुविधेमुळे, भारताबाहेर पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा फॉरेक्स कार्डची (Forex Card) गरज भासणार नाही.
With a 50.2% market share, PhonePe is the No.1 UPI app in India. Thank you for every moment you’ve trusted us. #PhonePeNo1UPIApp
— PhonePe (@PhonePe) February 6, 2023
Source: https://t.co/NZ3wxrZjUl pic.twitter.com/cFemrjgYJ3
“यूपीआय इंटरनॅशनल (UPI International) द्वारे आता भारताबाहेर UPI सेवा लोकांना अनुभवता येणारे पहिले मोठे पाऊल आहे. मला खात्री आहे की ही फिनटेक सेवा गेमचेंजर ठरेल आणि परदेशात प्रवास करणार्या भारतीयांच्या परदेशात खरेदी करताना पैसे देण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल घडवून आणेल,” असे कंपनीचे सह-संस्थापक आणि CTO राहुल चारी यांनी म्हटले आहे.
UPI इंटरनॅशनल अधिक देशांमध्ये आणले जाण्याची अपेक्षा आहे.
गेल्या महिन्यात, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (National Payments Corporation of India) सांगितले की, 10 देशांतील अनिवासी भारतीयांना- सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, यूएसए, सौदी अरेबिया, यूएई आणि युनायटेड किंगडम- यांना लवकरच यूपीआय पेमेंट सेवा प्रदान करण्याची परवानगी दिली जाईल.