Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आता UPI द्वारे दिवसाला पाठवा 5 लाख रुपये, शैक्षणिक-हॉस्पिटलशी संबंधित व्यवहारांसाठी होणार फायदा

UPI

Image Source : https://www.freepik.com/

यूपीआयद्वारे आता दिवसाला 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे. शैक्षणिक-हॉस्पिटलशी संबंधित व्यवहारांसाठी ही सूट देण्यात आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे.

केंद्र सरकार व आरबीआयद्वारे ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने पावले उचलली जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे यूपीआय व इतर ऑनलाइन माध्यमातून होणारे व्यवहार देखील वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर आता आरबीआयने यूपीआयच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, यूपीआयवरून 5 लाख रुपये हे केवळ शैक्षणिक अथवा हॉस्पिटलशी संबंधित व्यवहारांसाठी पाठवता येईल. आरबीआयच्या या निर्णयामुळे यूपीआयचा वापर करणाऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो, हे समजून घेऊयात.

आता यूपीआयद्वारे पाठवा 5 लाख रुपये

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यूपीआयवरून पैसे पाठविण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती दिली. दास यांनी सांगितले की, आता शैक्षणिक संस्था अथवा हॉस्पिटलशी संबंधित व्यवहारांसाठी यूपीआयवरून दिवसाला 1 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपये पाठवता येईल. तसेच, वेळोवेळी यूपीआयवरून करण्यात येणाऱ्या विविध व्यवहारांची मर्यादा वाढविण्यासाठी वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते. 

आधीची यूपीआय व्यवहार मर्यादा किती?

आतापर्यंत यूपीआयच्या माध्यमातून दिवसाला 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करणे शक्य होते. याशिवाय, प्रत्येक बँकेने निश्चित केलेली मर्यादा देखील वेगवेगळी आहे. मात्र, काही व्यवहारांसाठी ही मर्यादा वाढविण्यात आली होती. भांडवली बाजारातील व्यवहार, क्रेडिट कार्ड, ईएमआय, विमा इत्यादींचे व्यवहार 2 लाख रुपयांपर्यंत मर्यादित होते. तर डिसेंबर 2021 मध्ये रिटेल डायरेक्ट स्कीम व आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी व्यवहाराची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली होती. 

शैक्षणिक खर्चासाठी होईल फायदा

फी भरणे सोपेयूपीआयच्या व्यवहार मर्यादेत वाढ केल्याने शैक्षणिक फी भरणे सोपे होणार आहे. शैक्षणिक फी हजारो-लाखो रुपये असते. ट्यूशन फी, हॉस्टेलचे शुल्क व क्लासेसची फी अशा अनेक गोष्टींचा शैक्षणिक खर्चांचा समावेश होतो. यूपीआयवरून एकाचवेळी 5 लाख रुपये पाठवणे शक्य असल्याने हे सर्व व्यवहार मोबाइलच्या एका क्लिकवर करणे शक्य होईल. 
पैसे बाळगण्याची गरज नाहीशाळा-कॉलेजची फी जास्त असल्याने अनेकदा रोख रक्कम जवळ बाळगावी लागते. हे पैसे हरविण्याची व चोरी होण्याची देखील भिती असते. मात्र, यूपीआयद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहाराची मर्यादा वाढविल्याने आता रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. याशिवाय चेक, डिमांड ड्राफ्टच्या व्यवहारांमुळे लांबणारी प्रक्रिया देखील टाळता येईल. 
पारदर्शकतायूपीआयवरून दिवसाला 5 लाख रुपये पाठवणे शक्य असल्याने रोखीचे व्यवहार कमी होतील. यामुळे व्यवहारात पारदर्शकता देखील निर्माण होते. सर्व व्यवहारांची माहिती सोप्या पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे घरबसल्या इतर शहरातील कॉलेज, शाळांमधील अ‍ॅडमिशन प्रक्रिया देखील सहज पूर्ण करता येईल. 

हॉस्पिटलच्या व्यवहारांसाठी होईल फायदा

शैक्षणिक खर्चासोबतच हॉस्पिटलच्या व्यवहारांसाठी देखील यूपीआय पेमेंटची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. हॉस्पिटलचे बिल लाखो रुपये असते. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना रोख रक्कमेची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते. पैसे जमा करताना अनेक अडचणी येतात. मात्र, यूपीआयमुळे हॉस्पिटलचे बिल एका क्लिकवर भरणे शक्य होईल. आरोग्य सेवेत यामुळे मोठा बदल पाहायला मिळेल.