Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Floating Rate Savings Bonds: बँक एफडी पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या आरबीआय बचत रोखे बाबत जाणून घ्या

RBI Floating Rate Savings Bonds

RBI Bonds Give Higher Returns: गुंतवणुकीवर गॅरंटीड रिटर्न आणि अधिक नफा मिळवायचा असेल तर कुठे गुंतवणूक करणे योग्य ठरेल? असा प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल तर आरबीआयच्या बचत रोखे (Savings Bonds of RBI) बाबत जाणून घ्या.

RBI Higher Returns Plan: RBI फ्लोटिंग रेट बचत रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजदराने गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. कारण बचत रोख्यांवर दिले जाणारे व्याजदर हे बँक FD वर उपलब्ध व्याजदरापेक्षा जास्त आहे. यासोबतच लहान बचत योजनांवर (Small savings plan) मिळणारा व्याजदरही बचत रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना RBI बचत रोख्यांमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा मिळविण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

एनएससी सोबत जोडलाय सेव्हिंग बॉण्ड्स

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलैच्या आढाव्यात, फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड्सवरील व्याजदर 7.35% वरून 8.05% पर्यंत वाढवला आहे. RBI बचत रोख्यांवरील व्याजदर हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) शी जोडलेले आहेत. त्यामुळे NSC च्या व्याजदरातील कोणताही बदल हा RBI बचत रोख्यांवर देऊ केलेल्या व्याजदरामध्ये दिसून येतो. RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड्सवरील व्याजदर NSC वरील व्याजदरापेक्षा 0.35% जास्त आहे.

इतर योजनांवरील व्याजदर

केंद्र सरकार सप्टेंबर तिमाहीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) वर 7.7 टक्के व्याज दर देत आहे. तसेच 5-वर्षीय पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खात्यावर (MIS) सप्टेंबर तिमाहीसाठी 7.4 टक्के व्याजदर दिला जात आहे.

तसेच, तुम्ही मुदत ठेवींमधील (FD) गुंतवणुकीवर उपलब्ध व्याजदर पाहिला तर तो RBI बाँडच्या तुलनेत कमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य नागरिकांना एफडीवर 6.5 टक्के व्याज देते. HDFC बँक ICICI 7-7 टक्के व्याजदर देते. हा व्याजदर 5 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे.

आरबीआय सेव्हिंग बाँड्सचे फायदे

  1. भारतातील रहिवासी व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (HUFs) RBI च्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात.
  2. या बाँडमधील किमान गुंतवणुकीची मर्यादा 1,000 रुपयांपासून सुरू होते. परंतु कमाल रकमेवर काहीही मर्यादा नाही.
  3. RBI च्या फ्लोटिंग रेट बचत रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा कालावधी 7 वर्षांचा आहे. ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे.
  4. आरबीआय बाँड्स मॅच्युरिटी कालावधीवर व्याज देण्याची ऑफर देत नाहीत. रोख्यांची व्याजाची रक्कम दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी सहामाहीत दिली जाते.
  5. RBI च्या फ्लोटिंग रेट बचत रोख्यांवर व्याजदर दर सहा महिन्यांनी म्हणजे दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी रीसेट केला जातो.