Brand Value of Celebrities: देशातील सर्व सेलिब्रिटी आणि खेळाडू हे चित्रपट, स्पोर्ट्स, जाहिराती आणि विविध गोष्टींच्या माध्यमातून पैसे कमावत असतात. आज आपण अशाच सेलिब्रिटींची 2022 मध्ये किती संपत्ती होती, हे जाणून घेणार आहोत. या अहवालानुसार अभिनेता रणवीर सिंग हा 2022 मधील भारतातील सर्वात महागडा सेलिब्रिटी ठरला आहे. 'सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2022 - बियोन्ड द मेनस्ट्रीम'च्या अहवालानुसार, रणवीर सिंगने 181.7 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रॅण्ड मूल्यासह क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकले आहे.
Table of contents [Show]
विराट कोहली दुसऱ्या स्थानावर
विराट कोहली या यादीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून अव्वल स्थानावर आहे. कोहली 176.9 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूसह दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये सलग दोन वर्षात घसरण झाली आहे. 2020 मध्ये त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू 237 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त होती. पण 2021 मध्ये ती झपाट्याने घसरून 185.7 दशलक्ष डॉलर्स एवढी झाली.
अभिनेता अक्षय कुमार तिसऱ्या स्थानावर
अभिनेता अक्षय कुमार 153.6 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रॅण्ड मूल्यासह तिसऱ्या स्थानावर आहे. अभिनेत्री आलिया भट्ट 102.9 दशलक्ष डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने 82.9 दशलक्ष डॉलर्ससह ब्रॅण्ड व्हॅल्यूएशनसह पाचवे स्थान मिळवले.
इतरही सेलिब्रिटींचा सहभाग
अमिताभ बच्चन, हृतिक रोशन आणि शाहरुख खान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठी नावे आहेत. ज्यांनी सेलिब्रिटींच्या या यादीत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले आहे. माजी क्रिकेटपटू एम एस धोनी 80 डॉलर्स दशलक्षपेक्षा जास्त ब्रॅण्ड मूल्यासह यादीत सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकरने 2022 मध्ये टॉप 10 क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याने 73.6 दशलक्ष डॉलर्ससह या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
ब्रॅण्ड व्हॅल्यू 29.1 टक्क्यांनी वाढली
2022 मध्ये टॉप 25 सेलिब्रिटींची एकूण ब्रॅण्ड व्हॅल्यू 1.6 बिलियन डॉलर्ससह असण्याचा अंदाज आहे. जे 2021 च्या तुलनेत अंदाजे 29.1 टक्क्यांनी वाढले आहे. यावेळी प्रथमच, साऊथमधील स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांनी भारतातील टॉप 25 सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवले आहे. पीव्ही सिंधूसह नीरज चोप्रानेही टॉप 25 मध्ये स्थान मिळवले आहे. आलिया भट्टने देखील यावर्षी टॉप 5 मध्ये शानदार एंट्री केली आहे. आलियाने यावर्षी 68.1 दशलक्ष डॉलर्ससह ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये आपले स्थान पटकावले आहे.