केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या अर्थसहाय्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केली गेलेली आर्थिक तरतूद 2013-14 मधील रेल्वेच्या अर्थसंकल्पापेक्षा जवळपास 9 पट अधिक आहे.
नवीन गाड्यांबाबत कोणतीही घोषणा झाली नाही
मात्र, यावेळी मोदी सरकारच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात रेल्वेच्या नवीन गाड्या आणि नवीन रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र अर्थमंत्र्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. गेल्या वेळी अर्थमंत्र्यांनी 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती. याशिवाय, गेल्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या घोषणेदरम्यान, अर्थमंत्र्यांनी ‘राष्ट्रीय रेल्वे योजना 2030’ चीही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत रेल्वेच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. यावर अर्थमंत्र्यांनी सविस्तर स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते, ते मात्र झालेले नाही.
A capital outlay of ₹2.40 lakh crores has been provided for the Railways. This is the highest ever outlay and about 9x outlay made in 2013-2014: Hon’ble Finance Minister @nsitharaman #Budget2023#AmritKaalBudget pic.twitter.com/aGVAZZXzbx
— Ministry of Railways (@RailMinIndia) February 1, 2023
मागील योजना पूर्ण करण्यावर दिला जाईल भर
गेल्या अर्थसंकल्पात केल्या गेलेल्या घोषणांची पूर्तता या अर्थसंकल्पातून होणार आहे. या रेल्वे अर्थसंकल्पामुळे नवीन वंदे भारत गाड्या, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि इतर मोठे प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे. याशिवाय रेल्वेतील नवीन योजनांसाठी सरकारने 75 हजार कोटींची घोषणा केली आहे.
ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता
रेल्वेकडून ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक सर्वेक्षण 2022-23 नुसार, भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चात लक्षणीय वाढ केली आहे. यापूर्वी अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी संसदेत अमृतकालचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.