Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आनंदाची बातमी! PwC कंपनी 30 हजार नोकरभरती करणार

PwC job

अनेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात केली जात असताना एक आनंदाची बातमी जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी आहे. PwC या कंपनीने भारतामध्ये 30 हजार नोकरभरती करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे भारतातील मेट्रो शहरांमध्ये कार्यालये आहेत. फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.

अनेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात केली जात असताना एक आनंदाची बातमी जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी आहे. PwC या कंपनीने भारतामध्ये 30 हजार नोकरभरती  (PwC hiring) करण्याची घोषणा केली आहे. फेसबुक, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या कंपन्यांनी नोकरकपातीची निर्णय मागील काही दिवसांपूर्वी घेतला आहे. जागतिक मंदीचा फटका काही बड्या कंपन्यांना बसू लागल्याने त्यांच्यावर कर्मचारी कपातीची वेळ आली. 

पीडब्लूसी ही एक आघाडीची फायनान्शिअल सेवा पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी ब्रिटनमधील असून तेथे मुख्यालय आहे. जगभरामध्ये कंपनीची कार्यालये असून भारतामध्ये पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि मुंबईसह इतरही मोठ्या शहरांत कार्यालये आहेत. पुढील पाच वर्षात कंपनीकडून 30 हजार नोकरभरती करण्यात येणार आहे. भारतामध्ये येत्या काळात आणखी व्यवसायवृद्धीचे नियोजन कंपनीकडून करण्यात आले आहे. 2028 पर्यंत PwC ची भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या 80 हजारांपेक्षा होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

PwC India आणि PwC US या दोन्ही कंपन्या मिळून भारतामध्ये ग्लोबल सेंटर सुरू करणार आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या कार्यालयांची क्षमता आणखी वाढवणार आहेत. सध्या भारतामध्ये कंपनीचे 50 हजार कर्मचारी आहेत. येत्या काळात भारतीय नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी (PwC freshers hiring) निर्माण करू, तसेच कंपनीच्या ग्राहकांनाही चांगली सेवा देऊ, असे pwc चे अधिकारी टीम रायन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, डेल या कॉम्प्युटर निर्मिती करणाऱ्या कंपनीने साडेसहा हजार कर्मचारी कपातीचा (Job Layoff) निर्णय घेतला आहे. पर्सनल कॉम्प्युटरची मागणी रोडावल्याने कंपनीचा नफा कमी झाला होता. आज बोईंग या विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीने 2 हजार कर्मचारी कपातीची निर्णय घेतला आहे. जागतिक मंदीमुळे अनेक बलाढ्य आयटी कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. त्याचा फटका भारतीय कर्मचाऱ्यांनाही बसला. गुगल, अॅमेझॉन, बैजू, शेअरचॅट, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी कर्मचारी कपात (Mass layoff) केली आहे.