PMP Bus: मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील लोकसंख्यादेखील वाढत आहे. वाढत्या आयटी कंपन्यांसोबतच नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध असल्यामुळे पुण्यात बाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. हा विचार करता, पुणे महानगर परिवहन मंडळाने (पीएमपी) बसेस रस्त्यांवर आणण्याच्या प्रमाणात वाढ करीत आहेत.
दररोज पुण्याच्या रस्त्यांवर किती बस धावतात (How Many Buses are on the Roads of Pune Every Day)
पुण्यातील नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी सार्वजानिक वाहतूक व्यवस्था म्हणून पीएमटी (PMT)कडे पाहिले जाते. पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता, पीएमपी अधिकाधिक बस रस्त्यांवर आणण्याचा विचार केला आहे. आता सध्या पुण्यातील प्रवाशांची संख्या ही साडे बारा लाखांपर्यंत वाढली आहे. या तुलनेत पुण्यांच्या रस्त्यांवर 1600 ते 1650 बसेस धावत होत्या. यामधून पुणे महानगर परिवहन महामंडाळाला दररोज 10 ते 12 लाख उत्पन्न मिळत होते. आता या संख्येत वाढ होऊन मागील आठवडयापासून 1700 ते 1750 बसेस पुण्याच्या मार्गावर धावत आहेत. तसेच ई-बसमुळे प्रवासी आनंदी असल्याचे दिसत आहे. प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आणखी बसेस आणण्याची सुचना PMP चे (Pune Mahanagar Palika)चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. सोबतच ज्या ठिकाणी बससाठी जास्त गर्दी आहे, त्या जागेचा अभ्यासदेखील करण्यास सांगितले आहे.
ई-बसची संख्या 458 (Number of E-Buses 458)
सध्या पीएमपीजवळ 458 ई-बस उपलब्ध आहेत. या बसेस भेकराईनगर, वाघोली, निगडी, बाणेर, डेक्कन हे डेपो उत्तम प्रकारे सुरू आहेत. वाघोली डेपोमधून सध्या 105 बसेस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हा आकडा 458 पर्यंत येऊन पोहोचला आहे. या भागांची वाढती लोकसंख्या पाहता, येथे बसेस वाढण्याचीदेखील गरज होती. ती आता ई-बसने पूर्ण केली असल्याचे चित्र दिसत आहे. या भागांचा विकास पाहता, पुढे ही या ठिकाणी बसच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.