Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती पडू शकतात ऑनलाइन फसवणुकीला बळी, नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा 'या टिप्स

Online Fraud

Image Source : https://www.freepik.com/

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडणाऱ्यांमध्ये वृद्ध व्यक्तींची संख्या मोठी आहे. वृद्ध व्यक्तीला तंत्रज्ञानाबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींची फसवणूक होऊ नये यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

गेल्याकाही वर्षात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. इंटरनेटच्या मदतीने अनेक कामे जलद व सोप्या पद्धतीने पार पडत आहेत. मात्र, इंटरनेट जेवढे फायदेशीर आहे, तेवढेच यामुळे नुकसान देखील होत आहे. ऑनलाइन माध्यमातून आर्थिक फसवणुकीला बळी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

तसे तर ऑनलाइन फसवणुकीला कोणीही बळी पडू शकते. मात्र, यामध्ये वयोवृद्ध व्यक्तींचा आकडा मोठा आहे. डिजिटल बँकिंग व इलेक्ट्रॉनिक पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. वृद्ध व्यक्तीला तंत्रज्ञानाबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. United Nations Population Fund च्या एका रिपोर्टनुसार भारतातील वृद्ध नागरिकांची संख्या वर्ष 2025 पर्यंत 138 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नये यासाठी काय उपाय योजना करू शकता, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

घरातील वृद्धांची ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

वेगवेगळ्या स्कॅम्सबाबत द्या माहिती सर्वात प्रथम घरातील वृद्धांना वेगवेगळ्या स्कॅमबाबत माहिती देणे गरजेचे आहे. फोन स्कॅम, बँकिंग स्कॅम, एसएमएस स्कॅम अशा विविध माध्यमातून सायबर गुन्हेगार खासगी माहिती घेतात व फसवणूक करतात. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना अशा स्कॅमबाबत माहिती द्यावी व बँकेशी संबंधित माहिती कोणालाही शेअर करू नये याबाबत सांगावे.
बँकिंग अ‍ॅप्सच्या सुरक्षेबाबत द्या माहितीघरातील वृद्ध व्यक्ती यूपीआय अथवा बँकिंग अ‍ॅप्सचा वापर करत असल्यास त्याच्या सुरक्षेबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे आहे. अशा अ‍ॅप्सच्या माध्यमातूनच सर्वाधिक फसवणूक केली जाते. अशा अ‍ॅप्सचा वापर करण्यासाठी पासवर्डचा वापर करावा. तसेच, टू-फॅक्टर ऑथिंटिकेशन वापरावे. ज्यामुळे वृद्ध व्यक्ती सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार करू शकतील.
डिव्हाइस व सॉफ्टवेअर अपडेटवृद्ध व्यक्ती ज्या डिव्हाइसचा वापर करतात ते अपडेट असणे गरजेचे आहे. याशिवाय, फोनमधील अ‍ॅप्स देखील वेळोवेळी अपडेट करायला हवे. डिव्हाइसमध्ये अनावश्यक अ‍ॅप्स असल्यास ते डिलीट करावे. अशा अ‍ॅप्समुळे खासगी माहिती सायबर गुन्हेगारापर्यंत पोहचण्यास मदत होते. 
आर्थिक व्यवहारांवर ठेवा लक्षवृद्ध व्यक्तींच्या बँक खात्यावर व आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वेळोवेळी आर्थिक व्यवहार तपासल्यास फसवणूक तर झाली नाही ना? हे समजण्यास मदत होते. तसेच, फसवणूक झाल्यास त्वरित बँकेला माहिती द्या.

फसवणूक झाल्यास त्वरित बँकेला द्या माहिती

आर्थिक फसवणूक कोणासोबतही होऊ शकते. परंतु, फसवणूक झाल्यास त्वरित याबाबत तक्रार केल्यास पैसे परत मिळू शकतात. फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसात व बँकेकडे याबाबत तक्रार करावी. फसवणूक झाल्यानंतर 3 दिवसांच्या आत तक्रार केल्यास पैसे परत मिळू शकतात.

वृद्ध व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करतात व यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना विविध अ‍ॅप्स व डिव्हाइसचा सुरक्षितपणे कसा वापर करावा, याची माहिती द्यावी. यामुळे आर्थिक नुकसान टाळता येईल.