Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property Against Loan: प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घ्यायचं असेल तर 'या' गोष्टी लक्षात नक्की ठेवा

Property Against Loan

Property Against Loan: प्रॉपर्टीच्या बदल्यात कर्ज(Property Against Loan) हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार असून यामध्ये तुम्ही तुमचे घर, औद्योगिक किंवा व्यावसायिक मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता.

Property Against Loan: आर्थिक अडचणीच्या(Financial Crisis) वेळी मालमत्तेवर कर्ज घेता येते म्हणूनच अनेक जण मालमत्तेमध्ये गुंतवणूक(Investment) करतात. यामध्ये तुम्हाला इतर पर्यायांच्या तुलनेत जास्त रकमेचे कर्ज मिळते. त्याचा व्याजदरही(Interest Rate) पर्सनल लोनपेक्षा(Personal Loan) कमी असतो. प्रॉपर्टीच्या बदल्यात कर्ज(Property Against Loan) हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार असून यामध्ये तुम्ही तुमचे घर, औद्योगिक किंवा व्यावसायिक मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. मुख्यतः  मालमत्तेवर कर्जाचा वापर व्यवसायाचा विस्तार, विवाह(Wedding), मुलांचे उच्च शिक्षण(Education), वैद्यकीय इमर्जन्सी(Medical Emergency) इत्यादी कारणांसाठी केला जातो. मालमत्तेवर कर्ज देण्यासाठी बँका ग्राहकाचे उत्पन्न(Income), क्रेडिट हिस्ट्री(Credit History) आणि मालमत्तेचे मूल्य(Property Value) तपासतात. जर तुम्ही देखील मालमत्तेवर कर्ज(Property Against Loan) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. त्या कोणत्या हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.  

क्षमता तपासून घ्या(Check the capacity)  

कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या क्षमता तपासणे अतिशय गरजेचे आहे. कारण तुम्हाला हे माहिती हवे की मालमत्ता गहाण ठेवण्यामध्ये धोका असून  तुम्ही दर महिन्याला वेळेवर EMI न भरल्यास मालमत्ता तुमच्या हातातून जाऊ शकते. तुम्ही फक्त तेवढ्याच रकमेचे कर्ज घ्या, ज्याचा EMI भरणे तुमच्यासाठी सोपे असेल.

व्याजदराची तुलना करा(Compare interest rates)

मालमत्तेवरील कर्जाचा व्याजदर 9 ते 18 टक्क्यांपर्यंत आहे. यामध्ये ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर, त्याचे उत्पन्न, कर्जाचा कालावधी यासर्वांचा  समावेश असतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी कोणती बँक किती टक्के व्याजदराने कर्ज देते हे पाहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

कर्जासाठी प्रोसेसिंग फी तपासा(Check the processing fee for the loan)

बँका कर्ज देण्यासाठी कर्जाच्या रकमेच्या सुमारे 1% प्रक्रिया शुल्क आकारतात. त्याची किंमत 50,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. प्रोसेसिंग फी तपासून मगच तुम्ही बँक कर्ज घेण्यासाठी निवडा.

कर्जाचा कालावधी(Tenure of loan)

बऱ्याच बँका मालमत्तेवर 15 वर्षांसाठी कर्ज देतात. कर्जाचा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होतो. कार्यकाळ जास्त असेल तेव्हा EMI कमी असतो परंतु व्याजस्वरूपात जास्त पैसे द्यावे लागतात.

कोणता व्याजदर निवडावा?(Which interest rate to choose?)

व्याजदरात थोडासा बदल झाल्यास तसा फारसा परिणाम होत नाही. परंतु कर्जाच्या परतफेडीचा कालावधी जास्त असल्याने व्याजदरातील मोठ्या बदलाचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे, तुम्ही व्याजदराच्या परिस्थितीवर आधारित स्थिर आणि फ्लोटिंग दर यापैकी एक निवडा.