बारावीनंतर उच्च शिक्षण घेऊन तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठे बजेट आवश्यक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये लागतात. तुम्ही दुसऱ्या शहरात किंवा परदेशात शिकण्यासाठी जात असाल तर शिक्षण शुल्कासोबत राहण्या-खाण्याचा खर्चही जोडला जातो. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे उच्च शिक्षणासाठी बजेट नसेल तर शैक्षणिक कर्ज तुमचा आधार बनू शकते. अभ्यास पूर्ण केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर विद्यार्थी स्वत: शैक्षणिक कर्जाची परतफेड करू शकतो. आजकाल अनेक बँका उच्च शिक्षणासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहेत. तुम्ही एज्युकेशन लोन (Education Loan) कसे घेऊ शकता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घेवूया.
Table of contents [Show]
भारतात 4 प्रकारचे शैक्षणिक कर्ज दिले जाते
करिअर एज्युकेशन लोन
हे कर्ज करिअर ओरिएंटेड कोर्ससाठी दिले जाते. सरकारी किंवा गैर-सरकारी महाविद्यालय किंवा संस्थेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी करिअर शिक्षण कर्ज घेऊ शकतात.
अंडरग्रॅज्युएट लोन
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशातून किंवा परदेशातून पदवी मिळवण्यासाठी पदवीपूर्व कर्ज मिळू शकतं.
पॅरेंट्स लोन
आई-बाबा किंवा इतर पालक मुलाच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की शिक्षणासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांमध्ये सह-अर्जदार आवश्यक आहे.
प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडण्ट लोन
हे कर्ज ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थी घेवू शकतात. म्हणजेच, पदव्युत्तर पदवीसाठी प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन घेतले जाते.
कर लाभ मिळवा
भारतातील कोणताही नागरिक पदवी, पदव्युत्तर किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज घेऊ शकतो. मग तो भारतातून शिक्षण घेत असो किंवा परदेशातून. शैक्षणिक कर्जे महाविद्यालयाची फी भरण्यासाठी, पुस्तके खरेदी करण्यासाठी, दुसऱ्या शहरात किंवा परदेशात राहण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहेत. आयकर विभागाच्या कलम 80E अंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजावरही कर लाभ उपलब्ध आहे.
या कागदपत्रांची आवश्यकता
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा इतर ओळखपत्र
- विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- शाळा, कॉलेजची मार्कशीट
- अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व माहिती
- महाविद्यालय किंवा संस्थेकडून प्राप्त झालेल्या शुल्काचा संपूर्ण तपशील
- कायमचा पत्ता