ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन राहत होते ती वडिलोपार्जित घर 23 कोटी रुपयांना विकले. या घराचे नाव 'सोपान' असे होते. दिल्लीतील गुलमोहर पार्क भागातील ही जूनी वास्तू बच्चन यांनी विकली.
ऋतिक रोशन आणि राकेश रोशन यांच्या मालकीच्या फिल्म क्राफ्ट प्रोडक्शन या कंपनीसाठी मुंबईतील लोअर परेल भागात 10 हजार चौरस फुटाचे ऑफिस विकत घेतले. याची किंमत 33 कोटी रुपये आहे. मॅरेथॉन फ्युचरेक्स कॉम्पलेक्समध्ये हे कार्यालय असून त्यात चार ऑफिस सुरू करण्यात येणार आहेत. या जागेला आठ पार्किंग स्पेस आहेत.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने मुंबईतील बांद्रा परिसरात 119 कोटी रुपायांना चार फ्लॅट्स विकत घेतले आहेत. रणवीर सिंह आणि त्याचे वडील जगजीत भवनानी हे "ओह फाइव्ह, ओह मिडिया लिमिटेड" कंपनीमध्ये संचालक आहेत. ब्रँडस्टँड, बांद्रा परिसरातील सागर रेशम इमारतीत त्यांनी चार फ्लॅट विकत घेतले आहेत. हे फ्लॅट्स 16,17,18,19 व्या मजल्यावर आहेत.
अभिनेता अंशुमन खुराणा आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा यांनी मुंबईत 19 कोटी रुपये आणि 7 कोटी रुपये अशा किंतमतीला दोन फ्लॅट्स विकत घेतले.
अभिनेत्री जान्हवी कपूरने बांद्रा येथील उच्चभ्रू वसाहतीत 65 कोटी रुपयांना फ्लॅट विकत घेतला. या फ्लॅटचा एकूण कारपेट एरिया साडेसहा हजार चौरस फुटापर्यंत आहे. पाली हील या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर हे घर आहे. हा फ्लॅट जान्हवी कपूर, तिची बहीण खुशी कपूर आणि वडील बोनी कपूर या तिघांमध्ये मिळून घेतले आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने पश्चिम अंधेरी भागातील मालमत्ता संगीत निर्देशक डेबो मलिक याला विकली. यावर्षी ऑगस्ट महिन्यात हा व्यवहार झाला. या मालमत्तेचा कारपेट एरिया सुमारे बाराशे चौरस फूट आहे. या फ्लॅटची बाल्कनी 59 चौरस फुटाची आहे.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी शंकर दिक्षितने लोअर परेल भागात 48 कोटी रुपयांना सदनिका खरेदी केली. इंडसंड ब्लू या प्रोजेक्टमध्ये ही सदनिका आहे. सप्टेंबर महिन्यात हा व्यवहार झाला. ही सदनिका पाच हजार चौरस फुटांपेक्षा मोठी असून 53 व्या मजल्यावर आहे.